Ponda Organic Turmeric : पडीक जागेत पिकवली एक टन सेंद्रिय हळद!

मधू खांडेपारकर यांची किमया : खरेदीकडे कृषी खात्याची पाठ; बाजारपेठ नसल्याची खंत
Organic Turmeric
Organic TurmericDainik Gomnatak
Published on
Updated on

Ponda : बेतोड्याचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचायत सदस्य मधू विष्णू खांडेपारकर ( सातेरीमळ - निरंकाल) यांनी समाजसेवेबरोबरच कृषी क्षेत्रातही भरीव कामगिरी केली आहे. गोव्यात एक टनाहून अधिक हळद लागवड करण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे.

परंतु हळदीची लागवड केल्यानंतर कृषी खात्याकडून खरेदी केली जात नाही. तसेच बाजारपेठ नसल्याने हळदीची स्वतः विक्री करण्याची वेळ मधू खांडेपारकर यांच्यावर आली आहे.

सातेरीमळ - निरंकाल येथील मधू खांडेपारकर एकदिवस पडीक जागेत हळद पिकवण्याचा निर्णय घेतला. अनेक शेतकऱ्यांकडे चौकशी केली व यूट्यूबवर हळद लागवडीविषयी माहिती घेतली. त्यानंतर हळद लागवडीचा विचार त्यांनी प्रत्यक्षात आणला. हळदीची प्रतीभा ही जात त्यांनी निवडली व 2019-20 मध्ये 15 हजार चौमी. क्षेत्रात हदळ लागवड केली.

‘कोरोना’चे संकट कोसळले, तेव्हा त्यांनी सर्वप्रथम एक टन हळदीचे पीक घेतले.आम्ही हळद बॉईल करून त्याची केरी येथील मित्राच्या गिरणीतून पावडर करून घरी आणली. पण कृषी खात्याकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्याने आपण अडचणीत आलो,असे मधू खांडेपारकर यांनी सांगितले.

Organic Turmeric
Ponda News : युवा वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी गोमंतक गौड मराठा समाजातर्फे फोंड्यात विविध उपक्रम

विकासकामांमुळे पंचसदस्यपदी निवड

बेतोडा पंचायत क्षेत्रातील प्रभाग 10 मधून 2007 साली मधू खांडेपारकर पंच म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर 2023 साली त्यांची प्रभाग 11 मधून पुन्हा पंच म्हणून निवड झाली. बेतोडा पंचायतीचे सरपंच म्हणून 2012 साली त्यांनी 8 महिने काम पाहिले होते. सरपंच पदाच्या कारकिर्दीत अनेक विकास कामे केली. जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या सहकार्याने प्रभागात विविध विकासकामे मंजूर करून घेतली आहेत, असे खांडेपारकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com