काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर आज म्हापशात रंगणार जाहीर चर्चा..

दरम्यान, जाहीरनामा समिती जनतेच्या सूचना, मते ऐकून घेणार
Goa politics : Goa Congress Party
Goa politics : Goa Congress PartyDainik Gomantak

म्हापसा : गोवा (Goa Politics) प्रदेश काँग्रेस (Congress) समितीच्यावतीने तयार केलेल्या जाहीरनाम्याच्या मसुद्यावर मंगळवारी 26 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मरड-म्हापसा येथील मयुरा हॉटेलमध्ये जाहीर चर्चा होणार आहे.

Goa politics : Goa Congress Party
युवकांच्या 'रोजगारबाबत' गोवा सरकार गंभीर..

यावेळी जाहीरनामा समिती जनतेच्या सूचना, मते इत्यादी ऐकून घेणार आहे व त्यानंतरच पक्षाचे नेते पी. चिदंबरम आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीला जाहीरनाम्याचा अंतिम मसुदा सादर करण्यात येईल, अशी माहिती उत्तर गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके व म्हापसा गट अध्यक्ष शशांक नार्वेकर यांनी दिली. जाहीरनामा समितीचे अध्यक्ष रमाकांत खलप व उपाध्यक्ष एल्विस गोम्स यांनी यासंदर्भात प्रसृत केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे, की समाजातील विविध स्तरांतील लोकांच्या विधायक सूचना ऐकून घेण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Goa politics : Goa Congress Party
सिद्धीच्या मृत्यूचे प्रकरण हाताळण्यात गोवा पोलिसांच्या 'गंभीर चुका'

व्यापार-उदीम, शिक्षण, वित्त, समाजकल्याण, युवा आणि महिला, पर्यावरणविषयक संघटना, विद्यार्थी संघटना, अनुसूचित जमाती, मच्छीमार, मोटरसायकल पायलट, रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, बसमालक संघटना, प्रख्यात व्यवसायिक, बाजारपेठेतील व्यापारी संघटना, ज्ञातिसंस्था, अल्पसंख्याक, धार्मिक संघटना, बिगरशासकीय संस्था यांच्या प्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com