लोबोची पत्नी शिवोलीत 'अपक्ष' राहिली तर भाजपला फायदाच: माजी मंत्री मांद्रेकर

पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांची गरज लागते, पक्षातील नेत्यांवर कुरघोडी करुन पक्ष वाढत नाही.
माजी मंत्री दयानंद मांद्रेकर
माजी मंत्री दयानंद मांद्रेकरDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शिवोली मतदारसंघातून (Siolim Constituency) आपण चार वेळा निवडून आलो आहे. गेली २५ वर्षे मी शिवोलिच्या लोकांसाठी काम करत आहे. शिवोलित भारतीय जनता पक्षाची (BJP Goa) संघटना मजबूत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवोलीत पुन्हा एकदा भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे. ग्रामीण विकास मंत्री व कळंगुटचे आमदार मायकल लोबो (Rural Development Minister Michael Lobo) यांनी आपली पत्नी दिलायला लोबो (Delilah Lobo) यांना शिवोलीतून अपक्ष (Independence) ठेवणारअसल्याचे जाहिर केले आहे. आपली त्याला काहीच हरकत नाही. लोकशाहित कुणीही निवडणूक लढवू शकतो.

अनेक पक्ष यावेळी निवडणूकीत उतरणार आहेत. त्यात दिलायला लोबो अपक्ष राहील्या तरी भाजपला फायदाच होईल. अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व शिवोलीचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते दयानंद मांद्रेकर (Former Minister Dayanand Mandrekar) यांनी व्यक्त केली आहे. मायकल लोबो हे भाजपचे नेते आहेत तसा मीही भाजपचा नेता आहे. मी त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे. त्यांनी आपला मतदारसंघ पहावा. माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करु नये. अशी मी पक्षाकडे माझी भावना व्यक्त केली होती. ती रास्तच आहे. असेही मांद्रेकर म्हणाले. पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांची गरज लागते. पक्षातील नेत्यांवर कुरघोडी करुन पक्ष वाढत नाही. शिवोलीत भाजपची संघटना मजबूत आहे. त्यामुळे येथे कितीही पक्ष आले तरी भाजपला धोका नाही. मागिल विधानसभा निवडणुकीवेळी केंद्रिय स्तरावरील काही निर्णयावरुन विरोधकांनी अफवा पसरवल्या व त्याचा फटका आपणासह भाजपच्या काही उमेदवारांना बसला. असा खुलासा २०१७ च्या निवडणुकीत झालेल्य पराभवाबद्दल बोलताना मांद्रेकेर यांनी केला.

माजी मंत्री दयानंद मांद्रेकर
कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा: मंत्री नाईक

उमेदवारीचा निर्णय पक्षाचा

येत्या निवडणूकीत शिवोलीतून उमेदवारी कुणाला द्यायची याचा निर्णय पक्षाला घ्यायचा आहे. आपण पक्ष निवडणुकीत पराभूत होऊनही आपले काम चालूच ठेवले आहे. गेली साडेचार वर्षे आपण आमदार नसताना कामे केलीत. या उलट विद्यमान आमदार पुर्ण अपयशी ठरले आहेत.

दुसऱ्या पक्षात जाणार नाही

उमेदवारी मिळे वा ना मिळो आपण दुसऱ्या पक्षात जाणार नाही. भाजपमधून राजकीय कारकिर्दी सुरु केलीय. राजकीय निवृत्तीही भाजपमधूनतच घेणार आहे. भाजप व भाजपचे कार्यकर्ते हे आमचे कुटुंब आहे. त्यामुळे इतर पक्षात जाण्याबाबत विचारच नाही. त्याचबरोबर पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही याची खात्री मला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com