कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी जनतेने पुढाकार घ्यावा: मंत्री नाईक

मुरगाव नगरपालिकेच्या सडा येथे महात्मा गांधी जयंती दिनी स्वच्छ भारत अभियान 2.0 (Swachh Bharat Abhiyan 2.0)
प्रकल्पाची पाहणी करताना नगरविकास मंत्री मिलिंद नाईक सोबत इतर
प्रकल्पाची पाहणी करताना नगरविकास मंत्री मिलिंद नाईक सोबत इतरDainik Gomantak

कचरा विल्हेवाट (Garbage disposal) लावण्यासाठी राज्य नगरविकास मंत्रालयातर्फे (Ministry of Urban Development) विविध प्रकल्पांना चालना देण्याचे कार्य सुरू आहे. यासाठी राज्यातील जनतेने सुद्धा आपला सहभाग दाखवून कचरा समस्येवर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुरगावचे आमदार तथा नगरविकास मंत्री मिलिंद नाईक (Urban Development Minister Milind Naik) यांनी केले.

मुरगाव नगरपालिकेच्या सडा येथील कचरा प्रकल्पावर महात्मा गांधी जयंती दिनी स्वच्छ भारत अभियान 2.0 (Swachh Bharat Abhiyan 2.0) अंतर्गत 'स्वच्छता केंद्र', हिंदुस्तान कोकाकोला, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, मुरगाव नगरपालिका, राज्य नगर विकास संस्था व गोवा शिपयार्ड यांच्या भागीदारीत साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा कचरा प्रकल्पाचे उद्घाटन नगर विकास मंत्री मलिंद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, उपनगराध्यक्ष श्रद्धा शेट्ये, गोवा शिपयार्डचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बी. बी. नागपाल, पालिका संचालक गुरुदास पिळर्णकर, नगर पालिका सचिव तारीक थॉमस, मुरगावचे मुख्य अधिकारी जयंत तारी, मुरगावचे कचरा व्यवस्थापन समितीचे प्रमुख तथा नगरसेवक नारायण बोरकर, सूडाचे उपाध्यक्ष लिओ रॉड्रीगीस, राज्य आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष संजय सातार्डेकर, नगरसेवक दामू नाईक, सुदेश भोसले, मृणाली मांद्रेकर, मंजुषा पिळनकर, रामचंद्र कामत, देवीता आरोलकर व पालिकेचे इतर कामगार वर्ग उपस्थित होते.

प्रकल्पाची पाहणी करताना नगरविकास मंत्री मिलिंद नाईक सोबत इतर
नोकऱ्यांसाठी कुणीही पैसे घेत नाही घेतल्यास तक्रार करावी; CM सावंत

नगरविकास मंत्री नाईक म्हणाले की, मुरगाव नगरपालिका क्षेत्रात कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा कचरा प्रकल्पात आणखी वाढ करण्यात येईल. तसेच कचरा प्रकल्पाच्या बाजूस सौंदर्यीकरण करण्यात येईल. सडा कचरा प्रकल्पावरील नवीन बसवण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती शालेय विद्यार्थ्यांना देण्यात यावी. मुरगाव नगरपालिकेच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यानी पुढाकार घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांना कचऱ्यावर अशा प्रकारे नियंत्रण ठेवता येणार याची माहिती दिल्यास भविष्यात कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावता येईल.

प्रकल्पाची पाहणी करताना नगरविकास मंत्री मिलिंद नाईक सोबत इतर
युवा काँग्रेसने काढले 'सावंत सरकार'च्या विकासकामांचे धिंडवडे

यावेळी गोवा शिपयार्डचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांनी सामाजिक बांधिलकी अंतर्गत मुरगाव नगरपालिका मोहीम पुनर्प्राप्ती साहित्य सुविधा कचरा प्रकल्प उभारून दिला आहे. तसेच बी. बी. नागपाल यांनी या कचरा प्रकल्पाविषयी कामगारांना आरोग्य सेवेबरोबर पीपीई किट देण्याचे जाहीर केले आहे. राज्य आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष संजय सातार्डेकर यांनी सडा येथील नवीन कचरा प्रकल्पात चाळीस पंखे रोटरी क्लब ऑफ वास्को तर्फे पुरस्कृत करण्यात आले.

प्रकल्प ऑपरेटर प्रमुख पराग रांगणेकर यांनी प्रकल्पा विषयी माहिती देताना मुरगाव हे गोव्यातील पाच प्रमुख शहरांपैकी एक आहे आणि राज्यातील कचऱ्याच्या सर्वाधिक प्रमाणात योगदान देते. त्यातून दरमहा सुमारे २,००० मेट्रिक टन (MT) सुका कचरा निर्माण होतो, स्वच्छता केंद्रे एकात्मिक कचरा हाताळणी सुविधा आहेत जी एकत्रित कचरा पुनर्वापर करणार्‍यांकडे पाठवण्यापूर्वी वेगळे आणि पुनर्प्राप्त करतात. पृथ्वी प्रकल्प भारताच्या कचरा व्यवस्थापन व्यवस्थेमागील चेहरा - सफाई साथींचे कल्याण आणि आर्थिक समावेश सुनिश्चित करत आहे.

प्रकल्पाची पाहणी करताना नगरविकास मंत्री मिलिंद नाईक सोबत इतर
'स्वच्छ भारत अभियाना'निमित्त 'वास्कोत' स्वच्छता मोहिम

१ ऑक्टोबर २०२१ रोजी भारत सरकारने स्वच्छ भारत २.० लाँच केले. स्वच्छ भारत मिशन २.० चे मुख्य उद्दिष्ट "शहरे कचरामुक्त" बनवणे आहे. स्वच्छ शहर मिशनचा भाग म्हणून "शहरांमधील कचरा पर्वत" वर प्रक्रिया केली जाईल आणि काढून टाकली जाईल.

वास्को येथील स्वच्छता केंद्र मुरगाव शहरात शाश्वत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन मॉडेलला प्रोत्साहन देण्यासाठी दरमहा २०० मे.टन प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करेल. हे कल्याण, आर्थिक समावेश आणि १५० सफाई साथी सरकारी योजनांमध्ये प्रवेश करण्यास प्रोत्साहन देईल.स्वच्छता केंद्र शेड बांधकामाला गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) ने पाठिंबा दिला आहे आणि गोवा राज्य नागरी विकास एजन्सी (जीएसयूडीए) ने सुविधा दिली आहे. यूएनडीपीच्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा एक भाग म्हणून ही सुविधा खनिज फाउंडेशन ऑफ गोवा (एमएफजी) द्वारे कार्यरत आहे.

प्रकल्पाची पाहणी करताना नगरविकास मंत्री मिलिंद नाईक सोबत इतर
मार्लीवासीयांना 'गोवा मुक्ती'च्या 60व्या वर्षी रस्त्याची भेट

बिचोलीम, गोवा येथे पहिले स्वच्छता केंद्र स्थापन करून पृथ्वी प्रकल्प २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पाने आतापर्यंत ४७०० मेट्रीक टन+ प्लास्टिक कचऱ्यावर शाश्वत प्रक्रिया केली आहे आणि एसायक्लर लिंकेज तयार केले आहेत. त्याने स्वच्छता केंद्राद्वारे २०० सफाई साथीला समर्थन दिले आहे. सदर प्रकल्प भारत सरकारच्या स्वच्छ भारत (स्वच्छ भारत) मिशन, घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (सुधारणा) नियम १८ सह संबद्ध असल्याचे रांगणेकर शेवटी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com