तिकीटाचा नाही पत्ता आणि प्रचारासाठी चाललाय आटापिटा

भाजपचे मांद्रेचे विद्यमान आमदार व पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते दयानंद सोपटे यांचे भव्य शक्तिप्रदर्शन केले.
Goa Politics: भाजपचे मांद्रेचे विद्यमान आमदार व पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते दयानंद सोपटे यांचे भव्य शक्तिप्रदर्शन
Goa Politics: भाजपचे मांद्रेचे विद्यमान आमदार व पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते दयानंद सोपटे यांचे भव्य शक्तिप्रदर्शनDainik Gomantak

पणजी/मोरजी: गोवा विधानसभेच्या (Goa Assembly) निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. झाडून सारे पक्ष युती करावी की नाही या विवंचनेत अडकलेले असतानाच प्रमुख पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून प्रचाराची राळ उडविण्यास सुरवात केली आहे (Goa Politics) . या खटाटोपात आघाडीवर असलेले भाजपचे (BJP) मांद्रेचे विद्यमान आमदार व पूर्वाश्रमीचे काँग्रेस (Congress) नेते दयानंद सोपटे यांनी काल भव्य शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या या शक्तिप्रदर्शनाने माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Goa Politics: भाजपचे मांद्रेचे विद्यमान आमदार व पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते दयानंद सोपटे यांचे भव्य शक्तिप्रदर्शन
बाबूश मोन्सेरातांचे खंदे समर्थकच त्यांच्या विरोधात

अजून पार्लमेंटरी बोर्ड बसलेला नाही आणि निवडणूक जाहीरही झालेली नाही असे असताना मांद्रेची उमेदवारी कशी दिली? ही अफवा का पसरवली जाते? हे आपणास माहीत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया पार्सेकरांनी ‘गोमन्तक’कडे बोलताना व्यक्त केली. देवाला नारळ आणि गाऱ्हाणे पुन्‍हा घालायला आपली हरकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

पार्सेकर म्हणाले, मांद्रे मतदारसंघाची उमेदवारी अजून कुणालाही जाहीर झालेली नाही. कुणी देवीला नारळ ठेवला म्हणून हरकत नाही. मात्र, उमेदवारी आपल्यालाच मिळणार आहे. मी भाजपची कार्यपद्धती मागील 30 वर्षे अनुभवली आहे. पक्षाचा सचिव, राज्याचा सरचिटणीस (तीनवेळा), राज्याचा अध्यक्ष

(दोन वेळा), आमदार (तीन वेळा) व मंत्री आणि मुख्यमंत्रिपदी होतो. पक्षाकडून उमेदवारी कशी जाहीर होते, हे आपण जवळून पहिले. त्यामुळे चिंता नाही. दुसरीकडे, ज्यावेळी मी तुमच्यासाठी काहीच केले नव्हते. गरिबीतून संघर्ष करून वर आलेल्या अशा काळात माझ्यासारख्या युवकावर विश्वास ठेवून चार वेळा निवडून दिलात तशाच प्रकारे येत्या विधानसभा निवडणुकीतही मांद्रे मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन भाजपचे बावीसपेक्षाही जास्त उमेदवार निवडून द्या, असे आवाहन आमदार दयानंद सोपटे यांनी पार्सेत जनसंपर्क अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात केले.

Goa Politics: भाजपचे मांद्रेचे विद्यमान आमदार व पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते दयानंद सोपटे यांचे भव्य शक्तिप्रदर्शन
बाबूश मोन्सेरातांचे खंदे समर्थकच त्यांच्या विरोधात

सोपटेंसह इतरांचाही प्रचार; हवस्या, नवस्या, गवस्यांना आमदारकीची स्वप्ने

आपल्याला नक्कीच तिकीट मिळेल अशा आत्मविश्वासाने पक्षाच्या संमतीविना सुरू केलेल्या या प्रचार मोहिमेत केवळ सोपटेच नव्हे, तर इतर अनेक हौसे, नवसे आणि गवसे आमदारकीची स्वप्ने पाहात जनतेपुढे गाजर नाचवीत आहेत. प्रियोळ मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी संदीप निगळ्ये हे कार्यकर्त्यांच्या फौजफाट्यासह दारोदारी प्रचार करताना दिसतात. हल्लीच त्यांनी आपल्या निवडणूक कार्यालयाचे धुमधडाक्यात उद्‍घाटन केले. प्रियोळचे विद्यमान आमदार गोविंद गावडे हे रात्रीचे मतदारांच्या भेटी घेत आहेत, तर मगोपचे दीपक ढवळीकर यांनीही प्रचाराचा नारळ फोडला आहे.

रुडाल्फविरुद्ध डावपेच सुरू; शायनी ऑलीवेरा यांचे नाव पुढे

सांताक्रुझ मतदारसंघात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार रुडाल्फ फर्नांडिस यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी त्यांचे विरोधक वेगळेच डावपेच खेळताना दिसत आहेत. अचानक काँग्रेसच्या शायनी ऑलीवेरा यांचे बॅनर्स झळकले. गेल्या काही दिवसांत रुडाल्फ फर्नांडिस यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून सर्वांनी संगनमताने शायनी यांचे नाव काँग्रेसच्या उमेदवार म्हणून घुसविण्याचा उपद्‍व्याप सुरू केल्याचे रुडाल्फच्या गोटातून बोलले जात आहे.

सोपटे म्हणतात आपणच आमदार : जनसंपर्क मोहिमेसाठी मी पक्षाच्या नेत्यांकडे बोललो आहे. नेत्यांनी जनसंपर्क मोहिमेला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आपली ताकत हे पक्षाचे बळ आहे. आज हजारो समर्थक उपस्थित होते. मीच मांद्रेचा भाजपचा उमेदवार आहे. त्यामुळे इतरांना काय वाटते त्याची मी विचार करीत नाही.

कार्यकर्ते म्हणतात...

• किसान मोर्चाचे अध्यक्ष ठाकूर म्हणाले, हा जनसमुदाय पाहून उमेदवारीचा प्रश्न आताच सुटला आहे.

• भाजप उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष महानंद अस्नोडकर म्हणाले, की गोवा हा शांत प्रदेश आहे. आता बंगाल व दिल्लीहून काही पक्षाचे लोक येथे आलेले आहेत त्यांना थारा देऊ नका. येत्या निवडणुकीत भाजपच सत्तेवर येईल. त्यात दयानंद सोपटे मंत्री असतील.

• पक्षाचे निरीक्षक गोरख मांद्रेकर, मुख्यमंत्री सावंत यांच्यानंतर दयानंद सोपटे हे कार्यरत असलेले चांगले आमदार असून पुढील मंत्रिमंडळात त्यांची वर्णी निश्चित आहे.

सरकारच्या योजनांचा प्रचार, प्रसार करणे हे पक्षाच्या कार्यकर्त्याचें आणि आमदारांचे आद्य कर्तव्य आहे. त्या पद्धतीने प्रचार, प्रसार करीत असेल तर ते योग्यच आहे. तसे कार्यकर्त्यांनी आमदारांना सूचना दिल्या आहेत.

- सदानंद शेट तानावडे,

प्रदेशाध्यक्ष, भाजप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com