गोवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचारात भाग घ्यावा; पी. चिदंबरम

मतभेद विसरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचारात भाग घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय मंत्री तथा गोव्यातील काँग्रेस प्रभारी पी. चिदंबरम यांनी केले.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

Goa Politics: भाजप (BJP) सरकारने पुन्हा एकदा जनतेचा अपेक्षाभंग केला असून मागच्या निवडणुकीप्रमाणे (Election) या खेपेसही मुख्यमंत्र्यांसह (Chief minister) अनेक मंत्र्यांचा पराभव करून भाजपला घरी पाठवण्यासाठी गोव्यातील जनता सज्ज झाली आहे. त्यासाठी मतभेद विसरून काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचारात भाग घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ राष्ट्रीय नेते माजी केंद्रीय मंत्री तथा गोव्यातील काँग्रेस प्रभारी पी. चिदंबरम यांनी केले. (Goa politics congress workers should unite)

Goa Politics
बाबूश जेनिफर म्हापसा न्यायालयात; काय आहे पार्श्वभूमी?

साखळी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा साखळी येथील ‘ला तारा’ सभागृहात बोलावण्यात आली होती. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके, माजी मंत्री सदानंद मळीक, माजी आमदार प्रताप गावस, साखळी गट काँग्रेसचे अध्यक्ष मंगलदास नाईक, प्रदेश काँग्रेस सदस्य खेमलो सावंत, उत्तर जिल्हा काँग्रेस सचिव अनंत पिसुर्लेकर, साखळीचे नगराध्यक्ष राया पार्सेकर, नगरसेवक धर्मेश सगलानी, माजी नगराध्यक्ष सुनिता वेरेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मीकांत परब, माजी सरपंच प्रविण ब्लेगन, रेणुका देसाई, महादेव खांडेकर, निळकंठ गावस, सुर्याकांत गावडे आदींची उपस्थिती होती.

माजी आमदार प्रताप गावस म्हणाले, की हा मतदारसंघ मगोचा बालेकिल्ला होता. स्व. गुरुदास गावस यांनी काँग्रेसचे कार्य वाढवले. आपण आमदार असताना फुकट नोकऱ्या दिल्या. आज नोकऱ्या विकल्या जात आहेत. वीज, पाण्याची समस्या सुटलीच नाही, उलट बिले मात्र वाढवली. मुख्यमंत्री असूनही प्रमोद सावंत साखळीच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहेत.

नगरसेवक धर्मेश सगलानी म्हणाले, की आज सर्वात भ्रष्टाचारी म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची नोंद झाली आहे. हे सरकार केवळ दलाली करीत आहे. काँग्रेस गेली दहा वर्षे सत्तेत व प्रमोद सावंत आमदार, सभापती, मुख्यमंत्री बनले, पण साखळी पालिकेवर झेंडा हा काँग्रेसचाच आपण ठेवण्यास यश मिळवले.

माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मीकांत परब म्हणाले, प्रत्येक बुथवर ३०० मते म्हणजेच १५ हजार मते मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी अनंत पिसुर्लेकर, खेमलो सावंत, सुनिता वेरेकर, प्रविण ब्लेगन, सदानंद मळीक, महादेव खांडेकर, रेणुका देसाई, सुर्याकांत गावडे यांनीही विचार मांडले.

Goa Politics
कुंडई पंचायतीत पाणीप्रश्‍‍नी ठराव घेतला, कार्यवाही कुठे रखडली?

उमेदवार स्थानिकच : चिदंबरम

गोव्यातील जनतेने मागच्या निवडणुकीतच भाजप सरकारच्या अनेक मंत्र्यांना पराभवाचा हिसका दाखवून भाजप सरकारला घरी पाठवले होते, परंतु पैशांचे आमिष दाखवून काँग्रेसच्या आमदारांना फोडून भाजपने मागच्या दरवाजाने बेकायदेशीर जनतेच्या कौलाविरुध्द सरकार बनवले. जनता याचा बदला या निवडणुकीत घेणार आहे. कार्यकर्त्यांनी सुचविलेला उमेदवारच काँग्रेस निवडेल. उमेदवार स्थानिकच असेल, बाहेरून लादला जाणार नाही, असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.

राजेश सावळ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

यावेळी साखळी पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश केला. या सभेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उत्साह दाखवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com