Goa Politics: "अमित शहा, या भाजपचे ढोंग पाहा", काँग्रेसचा गृहमंत्र्यांना संदेश; 'म्हजे घर' योजनेवर प्रश्नचिन्ह

Amit Shah Goa visit: मडगाव काँग्रेस ब्लॉकने आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्याच मतदारसंघात मोठा दुटप्पीपणा सुरू असल्याचा गंभीर आरोप केला
Amit Shah in Goa
Amit Shah in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 'म्हाजे घर योजनेचे उद्घाटन करण्यासाठी गोव्यात आलेले असतानाच, मडगाव काँग्रेस ब्लॉकने आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्याच मतदारसंघात मोठा दुटप्पीपणा सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका बाजूला नियमितीकरणाच्या योजना आणायच्या आणि दुसरीकडे स्थानिक कुटुंबांना लक्ष्य करायचे, असा दुटप्पी व्यवहार सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.

'बिगर गोमंतकीयांना विशेषाधिकार, गोमंतकीयांवर अन्याय'

मडगाव काँग्रेस ब्लॉकचे संयोजक सावियो कुतिन्हो यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'म्हजे घर' योजनेतून सरकारी जमिनीवरील अनधिकृत बांधकामांना कायदेशीर दर्जा देण्याचा प्रयत्न सरकार करत असताना, मडगावातील मलभाट येथील एका मूळ गोमंतकीय नागरिकाला स्वतःच्या मालकीच्या खासगी जागेतील वडिलोपार्जित घर किरकोळ दुरुस्तीसाठी पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

"यावरून स्पष्ट होते की, गोमंतकीय नागरिकांना विशेषाधिकार मिळत नाहीत, पण बिगर-गोमंतकीय लोकांना मात्र विशेषाधिकार दिले जातायत," असे परखड मत कुतिन्हो यांनी व्यक्त केले.

Amit Shah in Goa
Amit Shah: अमित शहांच्या हस्ते 2451 कोटींच्या विकासकामांची होणार सुरुवात! मुखर्जी स्टेडियमवर 10 हजार लोक जमणार; वाहतूक मार्गात मोठे बदल

दिगंबर कामत यांचे आश्वासन फोल!

कुतिन्हो यांनी गृहमंत्री अमित शहा यांचे या प्रकरणाकडे लक्ष वेधले आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी काही महिन्यांपूर्वी मोतीडोंगर येथे दिलेले आश्वासन आठवण करून दिले. कामत म्हणाले होते; "जब तक दिगंबर कामत है, तब तक किसी की मजाल नही घर को हाथ लगानेकी."

मात्र तरीही मगडावमध्ये स्थानिकांच्या वडिलोपार्जित घरावर पाडकामाची टांगती तलवार लटकत असल्याचा विरोधाभास कुतिन्हो यांनी दर्शवला. त्यांनी आरोप केला की, कामत यांच्या सांगण्यावरून मडगाव नगर परिषद आणि एसजीपीडीए या दोन सरकारी संस्थांनी परस्परविरोधी पाडकामाचे आदेश जारी केले आहेत.

काँग्रेसचा भाजपला थेट इशारा

मडगाव काँग्रेस ब्लॉकरने भाजपला स्पष्ट इशारा दिला आहे की, आकर्षक पण बिनकामी योजनांनी जनतेला कितीही मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला तरी, २०२७ च्या निवडणुकीत या कृत्यांचा फटका भाजपला नक्कीच बसेल. कुतिन्हो यांनी सर्व राजकीय छळाच्या बळींना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आणि खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या आमदारांच्या "चमच्यांना" इशारा दिला की, "एके दिवशी या चमच्यांना त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांसाठी शिक्षा भोगावी लागेल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com