Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Aldona politics: म्हापसा येथील भाजप उत्तर गोवा जिल्हा कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.
Aldona news
Aldona newsDainik Gomantak
Published on
Updated on

Congress leaders join BJP Goa: गोव्याच्या राजकारणात, विशेषतः हळदोणा मतदारसंघात एक मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार कार्लुस फारेरा यांच्या समर्थकांमध्ये मोठी गळती लागली असून, त्यांच्या गटातील तब्बल ४० सक्रिय तरुणांनी बुधवारी (दि.१७) संध्याकाळी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चात अधिकृतपणे प्रवेश केला. म्हापसा येथील भाजप उत्तर गोवा जिल्हा कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

भाजपच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

या विशेष कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळयेकर, प्रदेश उपाध्यक्ष ग्लेन सौझा टिकलो आणि प्रदेश भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या नेत्यांनी सर्व ४० तरुणांचे पक्षात स्वागत केले.

हळदोण्यातील हे तरुण आमदार कार्लॉस फरेरा यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते, त्यामुळे त्यांच्या जाण्याने मतदारसंघातील काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेला मोठे भगदाड पडले आहे.

Aldona news
Goa Politics: मनोज परब यांच्‍यामुळेच युती झाली नाही! काँग्रेस–फॉरवर्ड युतीला जनता स्‍वीकारणार - माणिकराव ठाकरे

विकासाच्या धोरणांवर विश्वास आणि नेतृत्वाची ओढ

कार्यक्रमाला संबोधित करताना भाजप नेत्यांनी सांगितले की, तरुणांचा वाढता पाठिंबा हा पक्षाच्या विकासोन्मुख धोरणांचा विजय आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजप सरकारच्या कामावर तरुणांचा विश्वास वाढत आहे," असे मत नेत्यांनी व्यक्त केले.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तरुणांनी सांगितले की, त्यांना भाजपची भविष्यातील दृष्टी आणि कार्यपद्धती अधिक प्रभावी वाटते. राज्याच्या विकासासाठी आणि संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी आपण आता सक्रियपणे काम करू, असा निर्धार या तरुणांनी यावेळी व्यक्त केला.

हळदोण्याचे राजकीय समीकरण बदलणार?

हळदोणा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो, पण एवढ्या मोठ्या संख्येने तरुणांनी पक्ष सोडल्यामुळे तिथल्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, उत्तर गोव्यात भाजप आपली पकड अधिक मजबूत करत असल्याचे हे लक्षण आहे.

या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या संघटनात्मक शक्तीला मोठे बळ मिळाले असून, काँग्रेसला मात्र आपल्या बालेकिल्ल्यात आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात या पक्षबदलाचे पडसाद हळदोण्याच्या राजकारणात उमटलेले पाहायला मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com