Goa Politics: खरी कुजबुज, भाजपात जुना-नवा वाद संपता संपेना!

Khari Kujbuj Political Satire: पणजीत ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर पणजी महापौरांपाठोपाठ आमदारांनीही टीकेची झोड उठवली आहे. हे काम पूर्ण झाले आहे, असा दावा नोडल अधिकाऱ्यांनी केला आहे.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपात जुना-नवा वाद संपता संपेना!

‘शिगमा सरला, तरी कवित्व उरते’ ही म्हण आपण ऐकलीच असणार. भारतीय जनता पक्ष खतखते बनला आहे. अशी एका भाजपच्याच जुन्या कार्यकर्त्याने कोटी केली होती. यात तथ्य आहे.भाजपात सध्या इतर विचारसरणीच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा भरणा जास्त झाल्यामुळे मूळ जुने कार्यकर्ते ‘साईडलाईन’ झाले आहेत. जुन्या कार्यकर्त्यांना सरकार दरबारी मान राहिला नाही, असे आम्ही नव्हे भाजपचे जुने जाणते कार्यकर्तेच सांगतात. हा जुना नवीन वाद सोडविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनीही केला. फातर्पा येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी जुन्या व नवीन कार्यकर्त्यांच्या दुफळीमुळे केपे मतदारंघ गमावल्याचे सांगितले.मात्र, एवढे सांगूनही जुन्यांनी बाबूशी हस्तांदोलन केले नाही. असाच प्रकार मडगावात घडला. जुन्या कार्यकर्त्यांनी आमदारालाच ‘साईड लाईन’ केले. सर्व आमदारांना मोठे गुच्छ दिले आणि आमदाराच्या हाती, मात्र गुलाब फुल ठेवले. एवढेच नाही आमदारांना भाषण करण्याची संधीही दिली नाही. असे जुन्या-नव्यांमधील खटके कळंगुट, पणजी पासून कुंभारजुवेपर्यंत उडू लागलेत.ही भाजप साठी धोक्याची घंटा नव्हे का? ∙∙∙

‘स्मार्ट सिटी’चे काम अन् पिता-पुत्राची टीका

पणजीत ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरू असलेल्या कामांवर पणजी महापौरांपाठोपाठ आमदारांनीही टीकेची झोड उठवली आहे. हे काम पूर्ण झाले आहे, असा दावा नोडल अधिकाऱ्यांनी केला आहे तर ते पणजी महापालिकेकडे सुपूर्द का केले जात नाही, असा प्रश्‍न पणजीचे आमदार व मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी उपस्थित केला आहे. महापौर तसेच पणजीचे आमदार हे ‘आयपीएससीडीएल’च्या संचालक मंडळावर आहेत. त्यामुळे या कामाकडे लक्ष देण्याची जबाबदारी व कर्तव्य त्यांचेच आहे. मात्र गेल्या वर्षापासून उच्च न्यायालयाने या कामावर देखरेख ठेवण्यास सुरुवात केल्यापासून त्यातून अंग काढून घेतले. या कामाकडे त्यांनी पाहणीही करणेही सोडून दिले आहे. हे काम स्मार्ट सिटी अंतर्गत होत असल्याने त्याच्याशी आपला संबंध नाही, असे सांगितल्याने त्यावर मुलानेही (महापौर) त्यावर ‘री’ ओढली. कामांना झालेल्या विलंबामुळे पिता-पुत्र ती लवकर कशी पूर्ण होतील, यासाठी मदत करण्याऐवजी त्यावर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. ∙∙∙

कायतान यांना संकेत

आय-लीग फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स संघ अव्वल ठरल्याबद्दल चर्चिल आलेमाव यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी अभिनंदन केले. गोवा फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी कायतान फर्नांडिस आहेत. त्यांनी २०२२ च्या निवडणुकीत चर्चिलच्या पुत्राचा या निवडणुकीत पराभव केला होता. त्याचमुळे की काय संघटनेने चर्चिल ब्रदर्सचे अभिनंदन केलेले नाही. कायतान हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. असे असताना चर्चिल यांना मुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केल्याने त्यांनी यातून कायतान यांना योग्य तो संदेश दिल्याची चर्चा आहे. आता ऑक्टोबरमध्ये पुन्हा संघटनेची निवडणूक असल्याने हा अर्थ काढला जात आहे.

काँग्रेसची तत्परता

माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांची अखेर कॉंग्रेसला आठवण झाली आहे. एप्रिल २०२० मध्ये त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात त्यांना तब्बल साडेचार वर्षांनी का होईना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. कॉंग्रेसची पताका उंचावत ठेवण्यात देशप्रभूंचा मोठा वाटा होता. त्यांची प्रदेश पातळीवर पक्ष किती आठवण काढतो, हे सर्वांना माहीत आहेच. राष्ट्रीय पातळीवरही मृत्यूनंतर ४ वर्षांनी पक्षाने त्यांची आठवण काढण्यातून कॉंग्रेसने मात्र आपली तत्परता दाखवली आहे. ∙∙∙

Goa Politics
Goa Education: महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून; एकाचवेळी 5 महाविद्यालयांना देता येणार पसंती, येथे आहे अर्जाची लिंक

हे रँकिंग काढतो कोण अन् कसे?

‘नमनाला घडाभर तेल’ ही म्हण आपण ऐकलीच असणार. दहावीचा निकाल लागला आणि सोशल मीडिया व वर्तमानपत्रांत शाळांच्या निकालाच्या बातम्या व फोटो व्हायरल व्हायला लागले. मात्र, बहुतांश फोटोत शिक्षकच पुढे दिसतात. ज्यांनी यश मिळविले ते बिचारे विद्यार्थी मागे. एवढेच नव्हे तर काही शाळा तर आपण उत्तम निकालाची परंपरा कायम राखल्याचा दावा करताना दिसतात. बोर्डाने रँकिंग पद्धत बंद करून वीस वर्षे उलटली तरी काही शाळा चालक आपला विद्यार्थी गोव्यात प्रथम आल्याचा दावा करतात.त्यात भर म्हणून शिकवणी वर्ग चालविणारे ते विद्यार्थी आपल्यामुळे ‘नंबर एक’ झाल्याचा दावा करतात. मेहनत घेतात बिचारे विद्यार्थी अन् मिरवतात कोण? ∙∙∙

काँग्रेसची तत्परता

माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांची अखेर कॉंग्रेसला आठवण झाली आहे. एप्रिल २०२० मध्ये त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात त्यांना तब्बल साडेचार वर्षांनी का होईना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. कॉंग्रेसची पताका उंचावत ठेवण्यात देशप्रभूंचा मोठा वाटा होता. त्यांची प्रदेश पातळीवर पक्ष किती आठवण काढतो, हे सर्वांना माहीत आहेच. राष्ट्रीय पातळीवरही मृत्यूनंतर ४ वर्षांनी पक्षाने त्यांची आठवण काढण्यातून कॉंग्रेसने मात्र आपली तत्परता दाखवली आहे. ∙∙∙

Goa Politics
Goa Politics: 2027 च्या निवडणुकीत 52 टक्के मते मिळविणार, जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेत चाळीसही जागांवर लढणार; भाजपचा महत्त्वपूर्ण संकल्प

सावईकरांच्‍या मनातला कार्यकर्ता

सध्‍या भाजपने गोव्‍यात गाव चलो अभियान सुरू केलेले असताना त्‍याचाच मुहूर्त साधून की, काय माहीत नाही. पण दक्षिण गोव्‍याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी आपल्‍या फेसबुकवर कार्यकर्ता नावाची एक लहानसी कविता पोस्‍ट केलेली आहे. त्‍यात शेवटी त्‍यांनी, ‘ना जुना, ना नवा तरी सर्वांनाच तो हवा हवा!’ असे म्‍हणत या कवितेचा शेवट केला आहे. सध्‍या गोव्‍यात जुने भाजप कार्यकर्ते आणि नवीन भाजप कार्यकर्ते यांच्‍यात एकप्रकारचे शीतयुद्ध चालू आहे. त्‍याचा फटका भाजपाला लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्‍यात बसला होता. या पार्श्‍वभूमीवर नरेंद्र सावईकर यांची ही कविता भाजपच्‍या जुन्‍या कार्यकर्त्‍यांसाठी एक गूढ ठरले तर नवल नाही! ∙∙∙

त्यांनी आपली जनगणना सुरू केली?

‘शेजानी खुस्तार रोस काड्डीलो माडा मुळा उडवचो पडलो’, अशी कोकणीत एक म्हण आहे. सरकारने भंडारी समाजाची जनगणना सुरू करावी म्हणून भाजपचे काही पडेल आमदार राजकीय नेत्यांच्या दारी फिरत आहेत. खरेतर जगातील सगळ्यांत मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी जातीचा माणूस असताना इतरांच्या दारात यांना फिरण्याची गरजच नव्हती, असे आम्ही नव्हे स्वाभिमानी भंडारी म्हणतात. ‘जातनिहाय जनगणना करण्यासाठी विजय, ढवळीकर, डॉ. प्रमोद, पालेकर , पाटकर यांची काय गरज आहे. आम्हीच आमची जनगणना सुरू करू या ना’ आता काही बुजुर्ग भंडारी या पडेल आमदारांना सांगू लागलेत. त्या मानाने मराठ्यांना क्रेडिट द्यावे लागणार आपल्या जातीचा मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, समाजकल्याण मंत्री, आणि एकूण सहा आमदार असताना मराठ्यांनी आपल्या जातीची जनगणना स्वतःच सुरू केली आहे. सरकारची वाट काय पाहता, मराठ्यांकडून शिका, असे आता बुजुर्ग त्या माजी आमदारांना सांगू लागले आहेत. ∙∙∙

सावईकरांच्‍या मनातला कार्यकर्ता

सध्‍या भाजपने गोव्‍यात गाव चलो अभियान सुरू केलेले असताना त्‍याचाच मुहूर्त साधून की, काय माहीत नाही. पण दक्षिण गोव्‍याचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी आपल्‍या फेसबुकवर कार्यकर्ता नावाची एक लहानसी कविता पोस्‍ट केलेली आहे. त्‍यात शेवटी त्‍यांनी, ‘ना जुना, ना नवा तरी सर्वांनाच तो हवा हवा!’ असे म्‍हणत या कवितेचा शेवट केला आहे. सध्‍या गोव्‍यात जुने भाजप कार्यकर्ते आणि नवीन भाजप कार्यकर्ते यांच्‍यात एकप्रकारचे शीतयुद्ध चालू आहे. त्‍याचा फटका भाजपाला लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्‍यात बसला होता. या पार्श्‍वभूमीवर नरेंद्र सावईकर यांची ही कविता भाजपच्‍या जुन्‍या कार्यकर्त्‍यांसाठी एक गूढ ठरले तर नवल नाही! ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचा ‘लाडका विरोधक’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जेव्हा तीन प्रमुख विरोधी आमदारांचे नाव विचारले असता, त्यांनी आमदार विजय सरदेसाई, अ‍ॅड. कार्लुश फेरेरा आणि वीरेश बोरकर यांचे नाव घेतले. यात देखील सर्वाधिक झुंज देणारा आमदार वीरेश बोरकर असून मुख्यमंत्र्यांनी त्यांची स्तुती केली. या संभाषणातून मुख्यमंत्र्यांना वीरेशरावांच्याबद्दल बरीच माहिती असल्याचे दिसून आले. हा व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर मात्र काही जणांना तो आवडला नाही आणि त्यांनी ‘आरजी’चा आमदार ‘बी टीम’ असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. तर दुसरीकडे काही जणांना वीरेशराव चांगले काम करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले, अशा प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे ‘आरजी’चा आमदार मुख्यमंत्र्यांचा लाडका विरोधक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजकीय चर्चेला वाव मिळाला आहे. ∙∙∙

तारीफ की मस्‍का?

माजी उपमुख्‍यमंत्री बाबू आजगावकर हे हसतमुख व्यक्‍तिमत्त्व. ते काय बोलतील, याची उत्सुकता अनेकांना असते. सध्या ते राजकारणात पूर्णतः सक्रिय नाहीत, कधीतरी प्रकट होतात आणि ते चर्चेत राहतात. ‘काही वर्षांपूर्वी मगोप भाजपात विलीन झाला असता तर सुदिन ढवळीकर हे मुख्यमंत्री झाले असते’, हे बाबूंचे विधान सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या विधानावर माध्यमांनी बाबूंना काल छेडले. त्यावर ‘ढवळीकरांना मगो पक्ष सांभाळून ठेवला हे खरे असले तरी त्यांनी यापूर्वी मगोपला भाजपात विलीन केले असते तर तेही मुख्यमंत्री झाले असते’, असा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, तेवढ्यात त्‍यांना विद्यमान मुख्यमंत्री आठवले. ‘प्रमोद सावंत हे बहुजनांचे नेते असून तेही उत्तम कार्य करीत आहेत. प्रमोद सावंत हे नंबर वन मुख्यमंत्री आहेत’, असे बाबू लगेच उत्तरले. क्षणार्धात ढवळीकरांचा विषय हातावेगळा करणाऱ्या बाबूंनी मुख्‍यमंत्र्यांची ‘तारीफ’ करणे म्हणजे... ‘समझने वालो को इशारा’ काफी है! ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com