Goa Politics: दिगंबर कामतांचे गुजरात मॉडेल, म्हणजे विनाशकारी विपरीत बुद्धी!

Goa Politics: दिगंबर कामत यांनी हा 'गुजरात मॉडेल वटहुकूम' आणला आहे.
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: केवळ मडगाव पालिका हातची जाते म्हणून गुजरातच्या धर्तीवर गोव्यात नगराध्यक्ष निवडण्यासाठी हात दाखवून मतदान करण्यासाठी दिगंबर कामत यांनी हा ‘गुजरात मॉडेल वटहुकूम’ आणला आहे. ते दुसरे-तिसरे काही नसून ती ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आहे, अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली.

सरदेसाई म्हणाले, कुणाचाही अंत जवळ आला की तो माणूस चुका करू लागतो. कामत यांचाही राजकीय अंत जवळ आला आहे. कामत यांच्या सांगण्यावरून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हे गुजरात मॉडेल आणले आहे.

Vijai Sardesai
Goa News: कदंब महामंडळाची हरित दिशेने वाटचाल!

त्याऐवजी ते ज्यांना स्वतःचे मॉडेल मानतात, त्या योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात नगराध्यक्षांची निवड लोक थेट मतदानाने करतात, ते मॉडेल अंगिकारावे. तसे झाल्यास आम्ही कामत यांचा उमेदवार पाडून दाखवितो, असे आव्हान त्यांनी दिले. लोकांना एकत्र आणण्यासाठी आमचा पक्ष काम करणार आहे. आम्ही जनमत तयार करण्यासाठी आंदोलन उभारू, असे सरदेसाई यांनी सांगितले.

बेकायदा कामासाठी आणला होता वटहुकूम

सरदेसाई म्हणाले, आज पालिका निवडणुकीसाठी वटहुकूम आणला आहे. उद्या पंचायतींना नको असलेला कोळसा त्यांच्या माथी मारण्यासाठी पंचायत कायदा बदलण्यासाठी वटहुकूम आणला जाईल.

Vijai Sardesai
Margao municipality: ''पालिकेवर नियंत्रणासाठी वटहुकूम आणणे लाजिरवाणी गोष्ट''

बेकायदेशीर कामांना कायदेशीर स्वरूप देण्यात कामत माहीर आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी एका बांधकामाला संरक्षण देण्यासाठी वटहुकूम आणला होता. हे पुढे असेच चालत राहू नये, यासाठी आता लोकांनी या सरकारच्या विरोधात एकत्र येण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Colvale Police Arrest 29 Year Old
Girish Chodankar Tribal Sub Plan fund
RGP Party Office Access Restrictions
17186 Hectares Natural Farming Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com