Goa News: कदंब महामंडळाची हरित दिशेने वाटचाल!

Kadamba Corporation: जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर आणण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.
Goa News | Kadamba Corporation
Goa News | Kadamba Corporation Dainik Gomantak
Published on
Updated on

Kadamba Corporation: कदंब महामंडळाने प्रदूषणविरहित वाहतूक सुविधा तसेच इंधन बचत या प्रणालीवर आता विशेष भर देताना जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर आणण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. येत्या डिसेंबरमध्ये महामंडळाच्या हातात अशा 148 बसेस येतील व त्यामुळे कदंबच्या ताफ्यातील अशा बसेसची संख्या 248 होईल.

कदंबकडे अशा शंभर बसेस असून त्या विविध मार्गावर वाहतूक करतात व त्यांना प्रवासी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळतो. नव्या येणाऱ्या बसेस या अन्य प्रवासी मार्गावर सुरू केल्या जातील तर 50 बसेस फक्त स्मार्ट सिटीसाठी असतील व त्या पणजी महापालिका कार्यक्षेत्रात वाहतुकीसाठी असतील.

Goa News | Kadamba Corporation
Mapusa: दसऱ्या दिवशीच युवकावर काळाचा घाला; विजेच्या झटक्याने ओढवला मृत्यू

इलेक्ट्रिक बसेस या निसर्गप्रेमी तर असतातच म्हणजे त्या बँटरीवर चालत असल्याने प्रदूषण होत नाही, त्याचप्रमाणे इंधन खर्चात मोठी बचत होते. नव्या बसेस खरे तर नोव्हेंबरपूर्वी मिळणार होत्या, पण काही कारणामुळे त्या आता डिसेंबरपर्यंत दाखल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

चालक-वाहक भरती

आमदार तुयेकर म्हणाले, अनेक चालक, वाहक निवृत्त झालेले असून ती कमतरता दूर करण्यासाठी 60 चालक व 40 वाहक पदे लवकरच भरली जातील. त्यानंतर हे कर्मचारी नाहीत म्हणून बस रद्द करण्याचा प्रकार घडणार नाही. पणजी कदंब स्थानकाचे काम स्मार्ट सिटीच्या अंतर्गत केले जाईल. त्याचा पूर्णतः कायापालट होईल. त्याचप्रमाणे वास्को व फोंडा बसस्थानकांचे काम लवकरच हाती घेतले जाईल, तर म्हापसा बसस्थानकाचे काम पूर्ण झाले आहे.

Goa News | Kadamba Corporation
Amit Palekar: दसरा वाईट शक्तींना मारण्यासाठी असताना भाजप मात्र लोकशाही हत्येच्या प्रयत्नात

अध्यक्ष तुयेकर म्हणतात...

  • 48 इलेक्ट्रिक बसेस राहणार स्मार्ट सिटीसाठी

  • कदंबकडील इलेक्ट्रिक बसेसची संख्या होणार 248

  • काही मार्गासाठी डिझेल बसेस ठेवणे अपरिहार्य

  • 60 चालक व 40 वाहकांची होणार भरती

  • पणजी बसस्थानकाचा स्मार्ट सिटीखाली कायापालट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com