Goa Politics: खरी कुजबुज; सावर्डे मतदारसंघात दोन भाजप गट?

Khari Kujbuj: राज्‍यातील एकमेव महानगरपालिका असलेल्‍या पणजी मनपावर गेल्‍या अनेक वर्षांपासून मंत्री बाबूश मोन्‍सेरात एकहाती सत्ता गाजवत आहेत.
Goa Politics Khari Kujbuj
Goa Politics Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

सावर्डे मतदारसंघात दोन भाजप गट?

सावर्डे मतदारसंघात भाजपने गेली कित्येक वर्षे सत्ता भोगली. आजही गोव्यात भाजपची सत्ता असताना भाजपचे माजी खासदार व विद्यमान झेडपी सदस्य मिराबाग बंधाऱ्याला विरोध करणाऱ्या लोकांची भेट घेऊन काय सुचवू इच्छितात? ते लोकांबरोबर आहेत तर त्यांनी सरकारकडून बंधारा रद्द झाल्याचा शासकीय अध्यादेश घेऊन आंदोलकांची भेट घेणे उचित होते. ह्या भेटीतून ते नक्की काय सुचवू इच्छितात? भाजपच्या गाभा समितीचा सदस्य, माजी भाजप अध्यक्ष, माजी राज्य सभा खासदार ह्यांच्या शब्दाला काहीच किंमत नाही, हे तर ते दाखवत नाही ना? ∙∙∙

किती जणांचे पत्ते होणार कट?

राज्‍यातील एकमेव महानगरपालिका असलेल्‍या पणजी मनपावर गेल्‍या अनेक वर्षांपासून मंत्री बाबूश मोन्‍सेरात एकहाती सत्ता गाजवत आहेत. ‘पणजी माझी आणि मनपा तुझी’ असा शब्‍द बाबूशना देऊनच माजी मुख्‍यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकरांनी अनेक वर्षे पणजीची आमदारकी भोगली. त्‍यामुळे पणजीचे आमदार पर्रीकर असायचे, पण मनपा मात्र बाबूश यांच्‍या ताब्‍यात असायची, असे आजही बोलले जाते. येत्‍या मार्चमध्‍ये मनपाची निवडणूक होत आहे. परंतु, आरक्षणामुळे बाबूश समर्थक दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग राखीव झालेले आहेत. त्‍यातच यावेळी ५० टक्‍के नवे चेहरे देण्‍याचा संकल्‍प बाबूश यांनी केल्‍याने विद्यमान नगरसेवकांपैकी किती जणांचे पत्ते कट होणार? याकडे पणजीवासीयांचे लक्ष लागून आहे.

Goa Politics Khari Kujbuj
Goa Temple Theft: वेेरेत मंदिराची काैले काढून चोरांनी फंडपेटी केली लंपास, चौघा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार

कुसुम पंप कंत्राटदार गायब?

‘सत्ता हातात असली, की जनतेला लुटणे सोपे होते’ असा समज काही राजकारण्यांनी करून घेतला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कुसुम सोलर पंप योजना सुरू केली होती. या योजने अंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर शेतकरी आपल्या शेतात सोलर पंप बसवू शकतात. गोव्यात या योजनेचे कंत्राट म्हणे एका मंत्र्याच्या जवळच्या स्नेहीला मिळाले असल्याचे कळते. मात्र शेतकऱ्यासाठी हजारो रुपये खर्चून बसविलेले कुसुम पंप योग्य प्रकारे चालत नसल्याच्या तक्रारी आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी पंप बसविले, तो कंत्राटदार म्हणे शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखलच घेत नाही आणि नादुरुस्त पंप ठीक होत नाहीत. आता मंत्र्याच्या जवळच्या माणूस कंत्राटदार म्हणाल्यावर तो थोडाच शेतकऱ्यांना घाबरणार.बिचारे शेतकरी झक मारली आणि कुसुम सोलर पंप बसविला म्हणून कपाळावर हात मारून घेतात.

शिरोडकरांचा अभ्यास!

मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर हे अभ्यास करूनच पालिका बैठकीला येत असतात. त्यामुळेच असावे कदाचित, ते सर्व नगरसेवकांना नेहमीच वरचढ ठरतात. मागच्या आठवड्यात पालिका बैठकीत त्याचा प्रत्यय आला. नगरसेवकांच्या सर्व प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. कधी चढ्या आवाजात, तर अधूनमधून आवाजाची पट्टी कमी करून त्यांनी ही बैठक पार पाडली. एकंदर दामू रिंगमास्टरची भूमिका बजावीत आहेत. त्यांना ते सहजसाध्य होते. कारण त्यांच्या पाठीशी बाबाचा भरभक्कम हात आहे. हे आम्ही नव्हे, हा पालिकेतील अन्य नगरसेवकच दबक्या आवाजात बोलतात.

Bison In Goa: फोंड्यात गव्यांचा भररस्त्यात 'नाईट आऊट'! खडपाबांध ते ढवळी परिसरात नागरिकांची उडाली घाबरगुंडी; वन खात्याकडे बंदोबस्ताची होतेय मागणी

माशेलातही संगीत खुर्ची!

खांडोळा ग्रामपंचायतीत सरपंचावर अविश्‍वास ठराव दाखल झाल्याने पुन्हा ही पंचायत गोविंद गावडे समर्थकांकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच तिवरे-वरगावात म्हणजे माशेलातही सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहेत. एका हॉटेलात त्याबाबत गुप्त बैठक झाल्याचे चर्चा आहे. फक्त सरपंच कोण? त्यासाठी दोघांची रस्सीखेच सुरू आहे. नाव निश्‍चित होताच, माशेलातही सरपंचावर अविश्‍वास ठराव दाखल होण्याची शक्यता आहे. बुधवारी रात्री एका सोहळ्यात मेजवानीला एकत्र आलेल्या आजीमाजी पंचांच्या चर्चेत हा विषय होता. एखाद्या नवोदिताला संधी देण्याचा घाटही यावेळी घालण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही दिवसात संगीत खुर्चीचा खेळ सुरू होण्याची शक्यता आहे.

सरकारची मेहरनजर

काही सरकारी अधिकारी खरोखरच भाग्यवंत असतात. सार्वजनिक बांधकाम खात्यातील रस्ता विभागातील एक कार्यकारी अभियंता याच पठडीत बसत आहे. या सायबाला यापूर्वीच दोनदा सेवावाढ मिळाली होती. आता तिसऱ्यांदा त्यांना पुन्हा अशीच संधी मिळण्याचे संकेत आहे. सेवावाढीबाबतच्या सोपस्कारासाठी फाईल सध्या गृहसचिवाकडे आली आहे. अशीच जर सेवावाढ मिळाली, तर आम्हांला कधी प्रमोशन मिळेल, असे अन्य अभियंत्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यांचा आवाज ऐकून घेणार तरी कोण म्हणा शेवटी ‘जिसकी हात मे लाठी उसकी भैस’ म्हणतात, तेच खरे.

वास्कोत कोळसा वॉर

मुरगाव बंदरात होत असलेल्या कोळसा हाताळणीमुळे वास्को शहराला कोळशाच्या भुकटीचा त्रास होतो हा आरोप जूना आहे. माजी मंत्री मिलिंद नाईक यांनी आंदोलकांच्या सुरात सूर मिसळताच सत्ताधारी आमदार संकल्प आमोणकर काल आक्रमक झाले. त्यांनी प्रदूषण बंद करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा बंदरात घुसून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले आहे. आजवर जनतेसोबत आहे ही भूमिका त्यांनी योग्यरीत्या निभावली आहे. आता कोळसा वॉरमध्ये ते प्रतिस्पर्ध्यांवर कशी मात करतील हा वास्कोत चर्चेचा विषय ठरला आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com