

Congress RGP dispute: गोवा जिल्हा पंचायत (जि. पं.) निवडणुकीसाठी काँग्रेस आणि रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी (RGP) यांच्यात युती होणार की नाही, या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. आरजीपीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर, युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असतानाच या पार्श्वभूमीवर, गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी अत्यंत धक्कादायक खुलासा केलाय.
पाटकर यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने आपल्या युतीच्या भागीदारांशी ज्या ११ जागांवर चर्चा करण्याची गरज नव्हती, केवळ त्याच जागांवर आपली पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, काही जागांवर चर्चा सुरू असतानाही आणि प्रश्न सुटत नसताना, आरजीपीने उमेदवारांची यादी जाहीर करणे धक्कादायक आहे.
"आम्ही प्रत्येकाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु काही लोक युतीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, जे योग्य नाही," अशा शब्दांत पाटकर यांनी युतीमधील पक्षांवर (स्पष्टपणे आरजीपीवर) आपली नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, आज गुरुवार (दि.४) प्रदेश निवडणूक समितीची (PEC) बैठक आयोजित करण्यात आली असून, यात युती आणि उर्वरित जागांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या या गोंधळामुळे आम आदमी पार्टी (आप) चा 'एकला चलो रे' चा निर्णय योग्य ठरल्याचे चित्र दिसत आहे. 'आप'चे गोवा प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी काँग्रेस, गोवा फॉरवर्डआणि रिव्होल्युशनरी गोवन्स यांच्यातील संभाव्य विघटनावर प्रतिक्रिया दिली.
त्यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाचे उद्दिष्ट सकारात्मक आणि स्वच्छ राजकारण जपण्याचे आहे. विरोधी पक्षांच्या 'महागठबंधन' किंवा जागा वाटपाच्या योजनेबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाही, असेही पालेकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.