Goa Politics: अमित पालेकरांना 'आप' प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं! "वापरा आणि फेकून द्या" काँग्रेसने लगावला टोला

Amit Palekar Removed: पुढील आदेश येईपर्यंत श्रीकृष्णा परब यांच्याकडे गोवा युनिटच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय
Goa AAP political news
Goa AAP political newsDainik Gomantak
Published on
Updated on

Amit Palekar Removed as AAP State President: आम आदमी पार्टीच्या राजकीय व्यवहार समितीने (PAC) घेतलेल्या निर्णयानुसार, अॅड. अमित पालेकर यांना तातडीने गोवा प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी पुढील आदेश येईपर्यंत श्रीकृष्णा परब यांच्याकडे गोवा युनिटच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. जिल्हा पंचायत निवडणुकीतील पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर हा बदल करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया: "वापरा आणि फेकून द्या" मॉडेल

अमित पालेकर यांच्या हकालपट्टीनंतर काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी 'आप'वर जोरदार निशाणा साधला आहे. "२०२२ मध्ये अरविंद केजरीवाल यांनी भंडारी समाजाची मते मिळवण्यासाठी अमित पालेकर यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून वापरले. आता बहुजन समाजाचे नेते म्हणून त्यांचा वापर करून झाल्यावर, त्यांना बाजूला सारून त्यांचा अपमान करण्यात आला," अशी टीका पणजीकर यांनी केली. केवळ नावापुरते प्रतिनिधित्व द्यायचे आणि नंतर विश्वासघात करायचा, हेच 'आप'चे खरे "युज अँड थ्रो" मॉडेल असल्याची टीका त्यांनी केली.

Goa AAP political news
Goa Politics: सर्व विरोधकांची एकजूट गरजेची! युरींचा महायुतीचा पुनरुच्चार; आप,आरजीला सोबत घेण्याची तयारी

पक्षांतर्गत फेरबदलाचे संकेत

अमित पालेकर यांनी जिल्हा पंचायत निकालानंतर 'विरोधी ऐक्याची' भाषा केली होती. मात्र, पक्षाने त्यांना पदावरून हटवल्यामुळे 'आप'च्या आगामी रणनीतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. श्रीकृष्णा परब यांच्याकडे आता संघटना मजबूत करण्याची जबाबदारी असेल. मात्र, पालेकर यांच्यासारख्या मोठ्या चेहऱ्याला अचानक हटवल्यामुळे भंडारी समाज आणि बहुजन राजकारणावर याचे काय पडसाद उमटतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com