...म्हणून विद्यमान सरपंच पिल्ले व इतरांनी मला सरपंच पदावरून उतरविले होते

सध्या मंत्री गुदीन्हो यांना माझा विसर पडला आहे: रमाकांत बोरकर
Goa Politics: पत्रकार परिषदेत माहिती देताना साकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर बाजूस पंच नारायण नाईक,गणेश नाईक.

Goa Politics: पत्रकार परिषदेत माहिती देताना साकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर बाजूस पंच नारायण नाईक,गणेश नाईक.

Dainik Gomantak

Published on
Updated on

वास्को: साकवाळ पंचायत क्षेत्रात माझ्या कार्यकाळात 350 कोटींची कामे पूर्ण केलेली आहे. यावेळी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो मी विकास कामे करीत असल्याने माझे कौतुक करीत होते. सध्या मंत्री गुदीन्हो (Goa Politics) यांना माझा विसर पडला असल्याने मला डावलून साकवाळात विविध कामाचे उद्घाटन करीत आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Politics: पत्रकार परिषदेत माहिती देताना साकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर बाजूस पंच नारायण नाईक,गणेश नाईक.</p></div>
गोवा पोलिसांच्या थेट कारवाईत तब्बल 144 मोबाईल आणि 1 लॅपटॉप जप्त..

मी सरपंच असतानाचा साकवाळ पंचायत क्षेत्रातील जुआरी भागात दोन बीफ सेंटर, एक मद्यालयाला परवानगी नाकारली असल्याने, विद्यमान सरपंच पिल्ले व इतरांनी मला सरपंच पदावरून उतरविले होते. अशी माहिती साकवाळचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच रमाकांत बोरकर यांनी दिली. तसेच बिर्ला, जुआरी नगर परिसरात जुगार अड्डे, सट्टा बाजार व पेट्रोल भेसळ मोठ्या प्रमाणात चालू असून त्यांच्या मागे जो सूत्रधार आहेत त्याच्या विरोधात लवकरच तक्रार दाखल करण्यात येईल. गेल्या आठवड्यात मंत्री माविन (Minister Mauvin Godinho) यांनी कुठ्ठाळीचा भाजपचा (BJP) उमेदवार बाहेरचा असे संबोधून एकाप्रकारे जातीयवाद निर्माण केला असून त्याचा पडसाद संपूर्ण गोव्यात (Goa) पसरले आहे. मंत्री माविन यांना जातीयवाद वक्तव्य करणे सोबत नसल्याची माहिती बोरकर यांनी दिली.

वास्को येथे आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती साकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर यांनी दिली. यावेळी त्यांच्या समवेत पंच नारायण नाईक ,गणेश नाईक उपस्थित होते. पुढे पत्रकारांना माहिती देताना पांच बोरकर म्हणाले की पंचायत क्षेत्रात 350 कोटी पेक्षा जास्त कामे करून पंचायतीला विकास कामात अग्रेसर नेले होते. त्यावेळी पंचायत मंत्री माविन माझ्या कामा बद्दल माझे कौतुक करीत होते. विद्यमान सरपंच पिल्ले याने सरपंचपदी असताना साकवाळ पंचायतीत एकही प्रकल्पासाठी पुढाकार घेतलेला नव्हता. नवीन साकवाळ पंचायत घराचे काम अजूनही सुरू होत नसल्याने नागरिकांना जाब आम्हाला द्यावा लागतो. पंचायत घर उभारण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना सुद्धा विद्यमान सरपंच काम हाती घेत नसल्याचा आरोप बोरकर यांनी केला. जुआरी नगरात कचरा प्रकल्प उभारण्यासाठी उच्च न्यायालयातून परवानगी आम्ही आणली होती. याचे सुद्धा श्रेय पिल्ले घेत आहे. बिर्ला, जुआरी भागात बेकायदेशीर दुकानांना परवाने देण्याचे सत्र सद्या पिल्ले यांने सुरू केले आहे .मी सरपंच असताना दोन बीफ सेंटर,एका मद्यालयाला परवाना नाकारला होता. तेव्हा माझ्या विरोधात पिल्ले व त्याच्या साथी पंचानी अविश्वास ठराव दाखल केला होता. सध्या जुआरी नगर परिसरात जुगार अड्डा बरोबर सट्टाबाजार ,पेट्रोल भेसळ प्रकरणात वाढ झाली आहे. यात एक मोठा सूत्रधार असून त्याच्या विरोधात लवकरच तक्रार दाखल करणार असल्याची माहिती बोरकर यांनी दिली.

<div class="paragraphs"><p>Goa Politics: पत्रकार परिषदेत माहिती देताना साकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर बाजूस पंच नारायण नाईक,गणेश नाईक.</p></div>
Goa: 3 किमीसाठी 2000 रु. भाडे! गोव्यात पर्यटकांची लूट?

गेल्या आठवड्यात शिष्टाचार मंत्री माविन यांने कुठ्ठाळीत भाजपचा उमेदवार म्हणून एका इच्छूकांचे नाव जाहीर केले होते. मात्र त्यावेळी त्याने त्या उमेदवाराला बाहेरचा असे संबोधून एका प्रकारे जातीयवाद निर्माण केला होता. मंत्री माविन अशा प्रकारे विधान करणे म्हणजे समाजात जातियवाद करण्यासारखेच असल्याची माहिती रमाकांत बोरकर यांनी दिली. तसेच कुठ्ठाळीची माजी आमदार एलिना साल्ढाणा यांनी अनेक विकास कामे केली आहे. मात्र त्याना याकामाची प्रसिद्धी घेणे जमले नाही. कुठ्ठाळी मतदार संघातून येणारी विधानसभा निवडणूक आपल्या पक्षातून लढववी म्हणून अनेक राष्ट्रीय पक्षाबरोबर प्रादेशिक पक्ष माझ्या संपर्कात असल्याची माहिती पंच बोरकर यांनी दिली. यात भाजप पक्षातर्फे सुद्धा काही जणांनी माझ्याशी संपर्क साधला असल्याची माहिती बोरकर यांनी दिली.

पंच नारायण नाईक यांनी सांगितले कि साकवाळ पंचायत क्षेत्रात विद्यमान सरपंचाच्या आशीर्वादाने बेकायदेशीर कामे होत आहे. याला पूर्णपणे जबाबदार पिल्ले असल्याचा आरोप नाईक यांनी केला. साकवाळ भागातील कचऱ्यावर योग्य नियंत्रण न ठेवता बेकायदेशीर कामांना प्रोत्साहन देणे विद्यमान सरपंचानी सुरू ठेवले आहे. जुआरी कंपनीतील कोमू निदाद जागा, कायदेशीर करून विकण्याचे षडयंत सुध्दा सरपंच करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोमूनिदाद जमिन विकण्यापूर्वी सर्वसाधारण सभा घेणे महत्वाची असल्याची माहीती शेवटी पंच नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com