

Goa ZP election news: गोवा विधानसभेच्या आगामी २० डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी आम आदमी पार्टी (AAP) ने आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर, सत्ताधारी भाजप पक्षाने 'आप'च्या उमेदवारांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर 'आप'ने भाजपवर प्रतिहल्ला चढवत, भाजपला काही महत्त्वाच्या जागांवर पराभवाची भीती वाटत असल्यानेच ते असे प्रश्न विचारत असल्याचा आरोप केला आहे.
गोव्यातील 'आप'चे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी भाजपच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. 'आप'च्या उमेदवारांची निवड हा त्यांचा अंतर्गत विषय असताना, भाजप त्यात लक्ष घालून अनावश्यक प्रश्न का उपस्थित करतंय, असा सवाल पालेकर यांनी केला.
पालेकर यांनी थेट आरोप केला की, भाजपला आता काही प्रमुख मतदारसंघांतील जागा गमवाव्या लागतील अशी भीती वाटू लागलीये, त्यामुळेच भयभीत होऊन भाजप 'आप'च्या उमेदवारांच्या निवडीवर प्रश्न विचारून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतंय. 'आप'ने चिंबल, सांताक्रुझ आणि ताळगाव या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पालेकर पत्रकारांशी बोलत होते.
ॲड. पालेकर यांनी विशेषतः चिंबल मतदारसंघाचा उल्लेख करत, येथील स्थानिक आमदारावर जोरदार टीका केली. पालेकर म्हणाले की, चिंबलमध्ये पाण्याचा तीव्र तुटवडा आणि कचऱ्याची वाढती समस्या हे प्रमुख प्रश्न आहेत. मात्र, स्थानिक आमदार हे प्रश्न सोडविण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
'आप'चे उमेदवार: 'आप'ने या तिन्ही जागांवर आपले उमेदवार उभे केले:
चिंबल: मारिया क्रिस्टलिना अंताओ
सांताक्रुझ: राजश्री चारी
ताळगाव: दुर्गा सिल्वा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.