Goa: राजकारणी केंद्रातून मिळणाऱ्या पैशावर ताव मारण्यात व्यस्त; गोवा सुरक्षा मंच

डॉ. टी. बी. कुन्हा यांच्या स्मृतीदिना प्रित्यर्थ पुतळ्याला हार अर्पण करून 'भारत माता की जय' तर्फे आदरांजली
टी.बी.कुन्हा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 'भारत माता की जय'चे नितीन फळदेसाई, साईनाथ नाईक, सखाराम भगत व इतर (Goa)
टी.बी.कुन्हा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 'भारत माता की जय'चे नितीन फळदेसाई, साईनाथ नाईक, सखाराम भगत व इतर (Goa)दैनिक गोमन्तक
Published on
Updated on

Goa: गोव्याच्या राष्ट्रवादाचे जनक, गोव्याच्या मुक्तिलढ्यातला अभ्यासू आणि अलौकिक सेनानी पोर्तुगीजांचे षडयंत्र उधळून लावणारे गोव्यातल्या राष्ट्रवादाचे जनक डॉ. टी. बी. कुन्हा (Freedom Fighter Dr T B Kunha) यांच्या स्मृतिदिनाची गोव्याच्या स्वातंत्र्याच्या ६१व्या वर्षी वास्कोतील राजकारण्यांना तसेच समाजसेवकांना विसर पडणे ही शरमेची गोष्ट असून, राजकारणी आपल्या स्वार्थापोटी फक्त केंद्राकडून मिळत असलेल्या पैशावर ताव मारण्यास व्यस्त असल्याची घृणास्पद प्रतिक्रिया गोवा सुरक्षा मंचचे युवा अध्यक्ष तसेच 'भारत माता की जय'चे (Bharat Mata ki Jay) नितीन फळदेसाई यांनी व्यक्त केली.

टी.बी.कुन्हा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 'भारत माता की जय'चे नितीन फळदेसाई, साईनाथ नाईक, सखाराम भगत व इतर (Goa)
Goa: लक्ष्य पूर्तीसाठी आईवडिलांच्या भावनांची कदर ठेवा: रिचा

येथे असलेल्या डॉ. टी. बी. कुन्हा यांच्या पुतळ्याला आज त्यांच्या स्मृतीदिना प्रित्यर्थ हार अर्पण करून 'भारत माता की जय' तर्फे आदरांजली वाहिली यावेळी ते बोलत होते. गोवा मुक्तीसाठी कुन्हा यांनी केलेले कार्य अलौकिक आहे. त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात मोठे योगदान दिलं. गोव्याच्या जनतेत राष्ट्रवादाचा स्फुल्लिंग चेतावण्यास त्यांनी मोलाची कामगिरी केली. तसेच पुस्तक लिहून पोर्तुगीज अत्याचाराबाबत त्यांनी जनजागृती केली. अशा थोर सेनानीचा आज स्मृतिदिन. मात्र त्यांच्या स्मृती दिनाच्या वास्कोतील सगळ्या राजकारण्यांना विसर पडलेला आज पाहण्यात आले.गोव्याच्या स्वातंत्र्याच्या ६१व्या वर्षानिमित्त आलेले पैसे गेले कुठे.खरंतर हा पैसा स्वतंत्र सेनानींच्या पुतळ्याची डागडुजी करण्यास उपयोगात आणणे गरजेचे होते.पण येथील डॉ. टी.बी.कुन्हा यांच्या पुतळ्याची डागडुजी होत नाही.मुरगाव पालिकेने या पुतळ्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याने या पुतळ्याची बिकट अवस्था झाली आहे.

टी.बी.कुन्हा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून 'भारत माता की जय'चे नितीन फळदेसाई, साईनाथ नाईक, सखाराम भगत व इतर (Goa)
Goa Election 2022: सर्वच्या सर्व जागा लढवून जिंकण्याचा तृणमूल काँग्रेसचा निर्धार

आपली कडवट प्रतिक्रिया व्यक्त करताना फळदेसाई म्हणाले की, मुरगाव तालुक्यातील राजकारणी हे संधीसाधू असून ते फक्त स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली केंद्राकडून पैसा गोळा करण्यातच व्यस्त आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एक दोन तासाचे कार्यक्रम करून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करत आहेत व आपले खिसे भरण्यासाठी व्यस्त आहे. मात्र त्यांना थोर स्वातंत्र्यसेनानींचा ंविसर पडला आहे. ज्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. ज्याने पोर्तुगीजांचे षड्यंत्र उधळून लावले, अशा गोव्यातल्या राष्ट्रवादाचे जनक टी. बी. कुन्हा यांना विसरणारे भोंदू राजकारणी आपल्या स्वार्थासाठी फक्त पैसा करण्यास व्यस्त आहेत. ज्यांच्या प्रेरणेतून आज आम्ही गोव्यात ताठ मानेने मिरवतो आहोत. अशा थोर सेनानींना आजच्या दिनी आमचा प्रणाम असे फळदेसाई शेवटी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com