डिचोली: जगात अशक्य असे काहीही नाही. आपले ध्येय (The goal) आणि स्वप्नपुर्तीसाठी (dreams) येणाऱ्या अडचणींवर मात करीत लक्ष्याला गवसणी घाला. यश नक्कीच तुमच्यापाशी धावून येईल. 'लक्ष्य' पूर्तीसाठी आपल्या आईवडिलांच्या भावनांची कदर आणि सन्मान ठेवा. प्रबळ इच्छाशक्ती आणि खडतर मेहनतीच्या बळावर वैमानिकाचे स्वप्न पूर्ण केलेल्या साखळी शहरातील युवती रिचा लवू गोवेकर (Richa Lavu Govekar) हिने दिला आहे.
ओबीसी महासंघ, गोवातर्फे (OBC Federation, Goa) आयोजित गौरव सोहळ्यात रिचा हिने आपल्या भावना व्यक्त करताना आजच्या युवा पिढीला वरील संदेश दिला आहे.
रिचा म्हणाली, मी माझे स्वप्न जेव्हा माझ्या पालकांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला प्रोत्साहन देताना तयारीला लागण्यास सांगितले. आमचे कुटुंब सामान्य फक्त एक बुकस्टाॅल, हाच आमच्या कुटुंबाच्या चरितार्थाचा आधार, पण माझ्या पालकांच्या सहकार्यामुळेच, वडिलांच्या मेहनतीमुळे मोठ्या अडचणींवर मात करीत आकाशात झेप घेण्याच्या स्वप्नपूर्तीपर्यंत मी पोचले. असे रिचा हिने सांगितले.
ओबीसी महासंघातर्फे गौरव
सामान्य कुटुंबातील रिचा हिने वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल ओबिसी महासभा गोवा राज्यातर्फे तिचा गौरव करण्यात आला. साखळी येथे आयोजित केलेल्या गौरव समारंभास महासभेचे अध्यक्ष शशिकांत घाडी, महासचिव काशिनाथ मयेकर, खजिनदार विठोबा घाडी, सचिव सत्यवान हरमलकर, प्रसिध्दी प्रमुख रविराज च्यारी, प्रकाश घाडी, विठोबा घाडी, सुंदर जल्मी आदी कार्यकारिणी पदाधिकारी, वैमानिक रिचा हिचे आई-वडिल तसेच डिचोली तालुका महीला अध्यक्ष तेजस्विता गावकर, डिचोली मतदार संघ महिला अध्यक्ष सुषमा सावंत व साखळी मतदार संघ महिला अध्यक्ष संगिता खांडेकर आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी अध्यक्ष शशिकांत घाडी यांनी रिचा आणि तिच्या पालकांचे कौतुक केले. भविष्यात कोणतीही मदत लागल्यास ओबीसी महासभा सहकार्य करणार असल्याचे श्री. घाडी यांनी सांगून स्मतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन कु. रिचा हिचा गौरव केला. प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन महासचिव श्री. मयेकर यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.