Baga Drug Case: बागा येथे 5.10 लाख रूपयांच्या अमली पदार्थांसह युपीच्या युवकास अटक

अँटी नार्कोटिक्स सेलची धाड; अमली पदार्थ तस्करी परप्रांतीय तरूणांचा मोठा सहभाग
Baga Drug Case | Goa Crime News
Baga Drug Case | Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Baga: गोवा पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने बागा येथे टाकलेल्या धाडीत उत्तर प्रदेशातील युवकास अमली पदार्थांसह अटक केली. सत्यप्रकाश जानोआ असे त्याचे नाव असून तो मूळचा आग्रा येथील आहे. त्याच्याकडे 5.10 लाख रूपयांचे हशिश सापडले आहे.

Baga Drug Case | Goa Crime News
Ponda: वाहनचालकांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम; 2022 मध्ये तब्बल दोन कोटींचा महसूल जमा

गेल्या काही दिवसात गोवा पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने अनेक ठिकाणाहून अमली पदार्थ जप्त केले आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीत परप्रांतीय तरूण सक्रीय असल्याचे वारंवार समोर येत आहे.

गुरूवारीच आगशी येथे पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधी कारवाईत राजस्थानच्या एका युवकास अटक केली होती. त्याच्याकडून एकूण 194.08 ग्रॅम अफू जप्त केला होता. याची बाजारपेठेतील किंमत तब्बल 1 लाख 10 हजार रूपये असल्याचे सांगितले जाते.

पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. हेताराम हाजारीराम सारन असे अटक केलेल्या राजस्थानी युवकाचे नाव आहे. तो 26 वर्षांचा आहे.

Baga Drug Case | Goa Crime News
Vasco: माविन गुदिन्हो यांच्या हस्ते वास्कोत ‘ई’ बोध चिन्हाचे अनावरण

काही दिवसांपुर्वीच आगशी पोलिसांनी तेलंगणातील एकाला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. कनका परमेश्वर राव असे आरोपीचे नाव होते. पोलिसांनी येथील रेस्टॉरंटवर छापा टाकला आणि आरोपीला ताब्यात घेतले होते.

तर हणजूण येथील कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून एक लाख दोन हजार रूपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. यात 74 ग्रॅम चरस आणि 92 ग्रॅम गांजाचा समावेश आहे. हफजल हबीब (43) आणि प्रीतेश संगम (35) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पैकी हबीब हा मूळचा केरळचा आहे. तर प्रीतेश हा हणजूण येथीलच रहिवाशी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com