Goa Police: गोव्यातील 12 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. पोलिसांच्या आस्थापना मंडळाने याबाबत शिफारस केली होती. त्यानुसारच या बदल्या करण्यात आल्या आहेत. पणजीतील पोलिस मुख्यालयातील पोलिस अधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
या बदलीनुसार तत्काळ त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या आदेशानुसार खालील पोलीस निरीक्षकांची तत्काळ प्रभावाने त्यांच्या नावासमोर सूचित केलेल्या ठिकाणी बदली आणि नियुक्ती करण्यात आली आहे.
पणजी मुख्यालयातील दिएगो ग्रेसियाज यांची बदली कुंकळी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. एसबी सेंटर डिचोली येथील हरिश गवस यांची एस्कॉर्ट सेल म्हापसा येथे तर एस्कॉर्ट सेल म्हापसा येथील नवीन देसाई यांची एसबी सेंटर डिचोली येथे बदली केली गेली आहे.
सिक्युरिटी युनिटमधील संजय दळवी यांची बदली टीसी मडगाव येथे केली गेली आहे. तर टीसी मडगाव येथील गौतम साळुंके यांची पणजीतील पोलिस मुख्यालयात, सायबर क्राईमचे देवेंद्र पिंगळे यांची जीआरपी ई कॉय येथे,
पर्वरीतील अनंत गावकर यांची अल्तिनो येथील गोवा पोलिस वेल्फेयर सोसायटी येथे, शिवोली कोस्टल पोलिस स्टेशनचे राहुल परब यांची पर्वरी पोलिस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली आहे.
पीटीएस वाळपई येथील संदीप केसरकर यांची शिवोली कोस्टल पोलिसस्टेशनमध्ये, मार्दोळ पोलिस स्टेशनमधील मोहन गावडे यांची सिक्युरिटी युनिटमध्ये, गोवा पोलिस वेल्फेयर सोसायटी अल्तिनो येथील सतीश गावडे यांची मार्दोळ येथे बदली केली गेली आहे.
क्राईम ब्रँच रायबंदर येथील विकास देयकर यांच्याकडे सायबर क्राईम पोलिस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.