Vehicle Tires History: वाहनं अनेक चाकांचा रंग एकच! का असतो टायरचा रंग काळा? वाचा इतिहास

तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की प्रत्येक वाहनांचा रंग काळाच का असतो?
Car Tires History
Car Tires HistoryDainik Gomantak
Published on
Updated on

तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की प्रत्येक वाहनांचा रंग काळाच का असतो. तुम्ही पाहिले असेल की सायकलपासून ते विमानापर्यंत सर्व चाकांचे रंग हे काळे असतात. अगदी लहान मुलालाही विचारल्यास टायरचा रंग कोणीही काळा असाच सांगेल.पण टायर इतर रंगाचे का नसतात? आज आम्ही तुम्हाला या मागचे कारण सांगणार आहोत.

टायरचा (Tires) काळा रंग जाणून घेण्यापूर्वी टायरचा इतिहास (History) समजून घेणे गरजेचे आहे. टायरचा इतिहास 1800 सालापासून सुरू होतो. हाच काळ होता जेव्हा व्हीलराईट नावाच्या कारागिराने रबर टायरचा शोध लावला होता.

यानंतर चार्ल्स मॅकटोशने अॅमेझॉन (Amazon) आणि इतर ठिकाणी काही खास झाडांमधून काढलेल्या द्रवाचा वापर टायर बनवण्यासाठी केला. ज्याला नैसर्गिक रबर म्हणतात. पण हे सर्व टायर बाजारात यशस्वी होऊ शकले नाहीत.

नंतर 1839 मध्ये, चार्ल्स गुडइयरने व्हल्कनाइज्ड रबरचा शोध लावला, ज्यापासून यशस्वी टायर बनविण्यात आले.

Car Tires History
Morning Tips: चहा, कॉफी नाही तर 'या' पदार्थापासून करा दिवसाची सुरुवात

टायर हा शब्द टायरर या फ्रेंच (French) शब्दापासून बनला आहे. आज तुम्ही जे टायर पाहत आहात त्याआधी माणसांनी त्यांच्या काळात चामड्याचे, लोखंडाचे आणि लाकडी टायर बनवले होते.

ज्या प्रकारे जग झपाट्याने बदलत आहे आणि लोक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहेत. तो दिवस दूर नाही जेव्हा टायर रबरऐवजी इतर कोणत्यातरी साहित्यापासून बनवले जातील.

  • पूर्वी टायरचा रंग पांढरा होता

126 वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा टायरची निर्मीती झाली तेव्हा त्याचा रंग पांढरा होता. कारण ते ज्या रबरापासून बनवले होते ते पूर्णपणे दुधाळ पांढरे होते. पण हे साहित्य अतिशय कमकुवत असल्याने वाहनांचे वजन नीट घेता येत नव्हते.

त्यामुळेच नंतर ते मजबूत होण्यासाठी त्यात कार्बन ब्लॅक मिसळावा लागला. त्यामुळे त्याचा रंग काळा झाला. यामुळे टायर खुप मजबूत बनले. जे आज सर्वत्र वापरले जातात. म्हणून टारचा रंग हा पिवळा, लाल, हिरवा नसून काळ्या रंगाचा असतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com