गोवा पोलिसांना बचावकार्यासाठी पाहिजेत हेलिकॉप्टर

2019 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत राज्यात 750 जीवघेण्या अपघातांची नोंद झाली आहे.
Helicopter
HelicopterDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पोलिसांनी दुर्गम भागात होणार्‍या अपघातातील बळींची संख्या कमी करण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी दोन हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर वाहतूक व्यवस्थापनासाठी आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वापरले जावे, अशी पोलिसांनाही इच्छा आहे. (Goa police need helicopters for rescue missions)

Helicopter
म्हापशात वाहनधारकांना धोका निर्माण करणाऱ्या झाडांची छाटणी कधी होणार?

2019 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत राज्यात 750 जीवघेण्या अपघातांची नोंद झाली आहे. गोवा पोलिसांनी सुरुवातीला गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी, म्हापसा आणि मडगाव येथील दोन्ही जिल्हा हॉस्पिटलमध्ये हेलिपॅड बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. ट्रॅफिक सेलने राज्य सरकारला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, गोवा हे पर्यटन राज्य असल्याने देशी आणि आंतरराष्ट्रीय असे अंदाजे 80 लाख पर्यटक गोव्याला भेट देतात.

“गोवा राज्याच्या भौगोलिक स्थितीमुळे रस्त्यांचे जाळे गुंतागुंतीचे आहे. गोव्यात एकूण 5,042km रस्त्यांचे जाळे आहे ज्यात 263km राष्ट्रीय महामार्ग, 232km राज्य महामार्ग आणि 1,547km इतर रस्ते आहेत. 160 किमीचा किनारी पट्टा आहे. राज्यात वाहन अपघात आणि मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे,” असे पोलिस अधीक्षक म्हणाले.

Helicopter
गोव्यातील काजू उत्पादकांना सरकारच्या मदतीची अपेक्षा

गोवा पोलिसांनी (Police) म्हटले आहे की, काही वेळा अपघातग्रस्त व्यक्तीसाठी रुग्णवाहिका वेळेत घटनास्थळी पोहोचणे शक्य होत नाही. त्यांना हेलिकॉप्टरद्वारे दवाखान्यात (Hospital) पोहचवले जाऊ शकते.

“गोवा पोलिसांसाठी दोन हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. संकटात सापडलेल्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्याव्यतिरिक्त, मोठ्या कार्यक्रमादरम्यान रहदारी तसेच कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी यांचा वापर होऊ शकतो",पोलिस अधीक्षक म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com