न्हावेलीतील ‘ते’ अर्भक मातेच्‍या पान्ह्याला व्याकुळलेले!

नाळही न झडलेल्या नवजात अर्भकाला टाकले उकिरड्यावर
Goa police investigation was speeded up in case of throwing newborn baby on trash
Goa police investigation was speeded up in case of throwing newborn baby on trashDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: नाळही न झडलेल्या नवजात अर्भकाला उकिरड्यावर टाकल्‍याप्रकरणी पोलिस तपासाला गती देण्यात आली, तरी पोलिसांना अद्याप ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणी गूढ निर्माण झाले आहे. दुसऱ्या बाजूने ‘त्या’ अर्भकाची प्रकृती स्थिर असली, तरी अर्भक जन्मदात्रीच्या पान्ह्याला व्याकुळलेले आहे.

मायणा-न्हावेली येथे जिवंत अर्भक उकिरड्यावर टाकण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. त्‍यानंतर सर्वत्र खळबळ माजली असून, अर्भकाला उकिरड्यावर टाकण्याच्या प्रकाराबद्दल तीव्र चीड व्यक्त होत आहे. या निर्दयी कृत्य करणाऱ्या माता-पित्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे. अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने, की एखाद्या माता-पित्याने मुलगी म्हणून नवजात अर्भकाला टाकून दिले, आदी अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. डिचोली पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास चालू आहे.

Goa police investigation was speeded up in case of throwing newborn baby on trash
Goa Police: सापळा रचून हरमलात 3 लाखांचा गांजा जप्त

अर्भकाची प्रकृती स्थिर

‘त्‍या’ अर्भकाला गोमेकॉत दाखल केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असली, तरीदेखील ते अर्भक जन्मदात्या आईच्या पान्ह्याला व्याकुळलेले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com