Goa KTC Bus: ‘कदंब’च्या स्थलांतराची लोकांमध्ये जागृती करा

Goa KTC Bus: ‘गोवा कॅन’च्या लॉर्ना फर्नांडिस यांची मागणी
Goa KTC Bus:
Goa KTC Bus: Dainik Gomantak

Goa KTC Bus: पंतप्रधानांची सभा व त्यामुळे कदंब बसस्थानकाचे होणारे तात्पुरते स्थलांतर आम्ही केवळ वर्तमानपत्रांमध्ये वाचतो. सरकारने किंवा जिल्हा प्रशासनाने याबद्दल जाहीर सूचना काढलेली नाही. त्यामुळे प्रवासी व सामान्य लोकांमध्ये गोंधळ पसरलेला आहे.

Goa KTC Bus:
Goa Crime: रावण-सत्तरी येथे शाळकरी मुलीच्‍या अपहरणाचा प्रयत्न

सरकारने लवकरात लवकर याबद्दलची जागृती करणे आवश्यक असल्याचे मत गोवा कॅनच्या सचिव लॉर्ना फर्नांडिस यांनी बैठकीत मांडले. मंगळवार, 6 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित सभेच्या अनुषंगाने कदंब बसस्थानक काही दिवसांसाठी तात्पुरते बंद करण्यात येणार आहे.

हा विषय सोमवार, 29 रोजी दक्षिण गोवा रस्ता सुरक्षा व्यवस्थापनाच्या बैठकीत उपस्थित झाला. अतिरिक्त जिल्हाधिकारी विशाल कुंडईकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. वाहतूक पोलिस अधिकारी गैरहजर असल्याने त्यासंदर्भातील सविस्तर चर्चा होऊ शकली नाही.

गोवा कॅन पाळणार राष्ट्रीय सुरक्षा महिना

केंद्र सरकारने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी असा जाहीर केला असला तरी त्या संदर्भातील केंद्र सरकारची सूचना 10 ते 12 जानेवारीला मिळाली. त्यामुळे कसलीही तयारी करण्यास वेळ मिळाला नाही. गोवा कॅन 29 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2024 या दिवसांत राष्ट्रीय सुरक्षा महिना पाळणार असल्याची माहितीही लॉर्ना फर्नांडिस यांनी दिली.

बसस्थानक कुठे स्थलांतरित केले जाईल. त्यासाठी कुठला रस्ता निश्र्चित केला आहे. वाहतूक कुठल्या मार्गाने वळविली जाईल वगैरे काहीच माहिती लोकांना देण्यात आलेली नाही. जर ऐनवेळी हे सर्व काही जाहीर झाले तर लोकांमध्ये गोंधळा पसरण्याची शक्यता आहे.

- लॉर्ना फर्नांडिस, सचिव, गोवा कॅन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com