Goa Crime: दिल्लीतून गोव्यात आला बनावट पोलिस अधिकारी, व्यावसायिकाचा शूट केला अश्लील व्हिडिओ; Video Viral करण्याची धमकी देत उकळले 30 लाख

Businessman Blackmailed In Goa: दिल्ली पोलिसांच्या नार्कोटिक्स सेलचा अधिकारी असल्याचं भासवून एका व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून ३० लाख रुपये उकळल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
Goa Crime News
ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : दिल्ली पोलिसांच्या नार्कोटिक्स सेलचा अधिकारी असल्याचं भासवून एका व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून ३० लाख रुपये उकळल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी इमाद खानला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलीय.

पोलिसांच्या तावडीतून फरार

इमाद खान आणि त्याच्या साथीदारांनी म्हापशातील व्यावसायिकाचा अश्लील व्हिडिओ बनवून त्याला धमकावलं होतं. एवढंच नव्हे, तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले.

या प्रकरणात आरोपींनी आधी व्यावसायिकाकडून २० लाख रुपये उकळले, त्यानंतर पुन्हा धमक्या देत १० लाख रुपये उकळले होते. या प्रकरणी पोलिसांनी इमाद खानला मुंबईतून अटक केली होती. मात्र, गोवा पोलिस त्याला गोव्याला घेऊन जात असताना तो मुंबई सहारा विमानतळावर पोलिसांच्या तावडीतून फरार झाला.

Goa Crime News
Goa: प्रशासकीय, आर्थिक कार्यक्षमतेत गोवा तळाला! ‘स्कोच’चा अहवाल; महाराष्ट्र पहिल्या स्थानी

डीसीपी आदित्य गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमाद खान हा उत्तर प्रदेशातील सहारनपूरचा रहिवासी आहे. त्यानं आपल्या टोळीतील एका महिलेसह अन्य दोन साथीदारांच्या मदतीनं हा कट रचला. व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत त्यांनी व्यावसायिकाकडून पैसे उकळले.

पीडित व्यावसायिकानं गोवा पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर, म्हापसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करत आरोपींना अटक केली. मात्र, गोव्याला नेत असताना इमाद खान मुंबई सहारा विमानतळावरून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला. त्यामुळं या प्रकरणात आणखी एक गुन्हा मुंबईतील सहार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

शिमलामधून केली अटक

इमाद खान आणि त्याच्या गँगनं पीडित व्यावसायिकाकडू पैसे उकळण्याचा सापळा रचला होता. त्यांनी स्वतःला दिल्ली पोलिसांच्या नार्कोटिक्स सेलचा निरीक्षक असल्याचं सांगितलं. त्यांनी पीडितेचा मोबाईल फोन, कागदपत्रे, लॅपटॉपचे पासवर्ड, डिजिटल मीडिया अॅक्सेस, वॉलेट आणि अन्य महत्त्वाच्या वस्तू काढून घेतल्या.

इमाद खान हा डेहराडूनमधील शिमला बायपास रोड येथे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलीस निरीक्षक विवेकानंद यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकानं त्याला तिथून अटक केली.

Goa Crime News
Goa Politics: बैल - म्हशींनी माझ्यावर टीका करू नये, भाजपला 'मगो'सोबत युती करण्याची गरज नाही; मंत्री गावडे स्पष्टच बोलले

साथीदार अटकेत

टोळीतील प्रमुख आरोपींमध्ये बासित, फैजान, भुवन, यासिर, सलमान आणि एका महिलेचा समावेश होता. या महिलेनं इमाद खानला मुंबईतील एका व्यावसायिकाबाबत माहिती दिली आणि त्याच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला. ऑगस्ट २०२३ मध्ये इमाद खान आणि त्याच्या साथीदारांनी म्हापशात दोन व्हिला बुक करून संपूर्ण कट रचला होता.

या प्रकरणात आधीच आरोपी बासित, फैजान, भुवन आणि यासिर यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, इमाद खान हा अद्याप फरार होता. अखेर गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला शोधून अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com