Drug Case
Drug CaseDainik Gomantak

Goa Crime: गोव्यात अमली पदार्थविरोधात कारवाई सुरुच; मयड्यात एकाच्या मुसक्या आवळल्या

गोवा पोलिसांनी साडेपाच लाखाचा मुद्देमाल केला जप्त
Published on

गेल्या काही दिवसांपासून गोवा पोलिसांनी अमली पदार्थविरोधात कारवाईचा वेग वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर आज बार्देश तालुक्यातील मयडे येथे अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

(Goa Police has arrested one person for possessing drugs at Moira Bardez )

Drug Case
Goa News : बळीराजा ‘रब्बी’ शेतीसाठी सज्ज

मिळालेल्या माहितीनुसार मयडे तालुका बार्देश येथे गोवा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत एकाला अटक केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 5.50 लाखाचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. जप्त केलेल्या अमली पदार्थामध्ये चरस आणि गांजा यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर संशयिताचे नाव रवी नाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

Drug Case
Goa News : म्‍हापसा बाजारपेठही साहित्‍याने फुलली!

संशयिताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी त्याप्रमाणे मयडे परिसरात सापळा रचला व घटनास्थळावरुन संशयिताला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील संशयिताचा आणखी कोणत्या गुन्ह्यात समावेश आहे का ? याचा तपास सुरु आहे. त्यानुसार गुन्हे नोंद केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आठ महिन्यात 114 किलो अमली पदार्थ जप्त

गोवा पोलिसांनी अमली पदार्थाविरोधातील कारवाईत आठ महिन्यांत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 114 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. तसेच दर आठवड्याला सरासरी तीन ठिकाणी छापेमारी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com