Goa News : म्‍हापसा बाजारपेठही साहित्‍याने फुलली!

ग्राहकांची गर्दी : ऊस, चिरमुले, चिंच, आवळे खरेदी करण्‍यासाठी उडतेय झुंबड
Mhapsa market also literature
Mhapsa market also literaturedainik gomantak
Published on
Updated on

बार्देश : म्‍हापसा बाजारपेठही तुळशी विवाहासाठी लागणाऱ्या वस्‍तूंनी गजबजली आहे. ऊस, चिरमुले, चिंच, आवळे अशा विविध वस्तू बाजारात दाखल झालेल्‍या आहेत. त्या वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.

बार्देश तालुक्यातही इतर तालुक्यांप्रमाणेच ब्राह्मणांच्या साक्षीने तुळशी विवाह लावण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्‍व आहे. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजनोत्सव म्हणजेच तुळशी विवाह सोहळा. तुळशी विवाह तोंडावर येऊन ठेपवल्‍याने घरोघरी तुळशीवृंदावनांची साफसफाई, रंगरंगोटी सुरू आहे. म्हापसा बाजारपेठेत ग्रामीण भागातील विक्रेते चिंचा, ऊस, आवळे, दिणा आदी तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्‍य घेऊन येतात. तर, काही विक्रेते चुरमुरे, गावठी पोहे, चुरमुऱ्यांपासून बनवलेले लाडू घेऊन येतात. त्याचप्रमाणे परराज्यांतील विक्रेत्यांचीही संख्‍याही वाढलेली आहे.x

बार्देश तालुक्यातही इतर तालुक्यांप्रमाणेच ब्राह्मणांच्या साक्षीने तुळशी विवाह लावण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्‍व आहे. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजनोत्सव म्हणजेच तुळशी विवाह सोहळा. तुळशी विवाह तोंडावर येऊन ठेपवल्‍याने घरोघरी तुळशीवृंदावनांची साफसफाई, रंगरंगोटी सुरू आहे. म्हापसा बाजारपेठेत ग्रामीण भागातील विक्रेते चिंचा, ऊस, आवळे, दिणा आदी तुळशी विवाहासाठी लागणारे साहित्‍य घेऊन येतात. तर, काही विक्रेते चुरमुरे, गावठी पोहे, चुरमुऱ्यांपासून बनवलेले लाडू घेऊन येतात. त्याचप्रमाणे परराज्यांतील विक्रेत्यांचीही संख्‍याही वाढलेली आहे.

पर्यटकांचीही बाजारात गर्दी

म्‍हापसा ही उत्तर गोव्‍यातील एक प्रमुख बाजारपेठ. गोव्‍यासह शेजारच्‍या सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील आणि कर्नाटक राज्‍यातील विक्रेतेही म्‍हापसात आपला माल खरेदी करण्‍यासाठी येतात. त्‍यामुळे गिऱ्हाईकांचीही या बाजारपेठेत मोठी गर्दी असते. सध्‍या पर्यटन हंगाम सुरू झाल्‍यामुळे देशी पर्यटक गोव्‍यात मोठ्या संख्‍येने दाखल झालेले आहेत. तेही म्‍हापशात येतात.

विविध रंगांचा ‘भाव’ वाढला

तुळशीविवाह म्‍हटला की तुळशीवृंदावनाची रंगरंगोटी आलीच. हे काम युवक रात्रंदिवस मेहनत घेऊन करतात. त्‍यासाठी रंगांची आवश्‍‍यकता असते. त्‍यामुळे सध्‍या बाजारात रंगांना मोठी मागणी आली आहे. विशेषत: ऑईल पेंट रंग खरेदीसाठी गर्दी होत आहे. शिवाय रंगविण्‍यासाठी ब्रश आणि तत्‍सम साहित्‍यही खरेदी करण्‍याकडे युवकांचा कल आहे. पण या साहित्‍याचा दर वाढलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sewage Water In Colva Creek
Goa Assembly Election 2027 updates
Goa CM assures solution to Mapusa traders problems
Russian Woman Marriage Registration
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com