Goa Police: गोवा पोलिसांची धडक कारवाई; तब्बल 2.02 कोटींचे 46 किलो अमलीपदार्थांचा साठा नष्ट केला, वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही उपस्थिती

Goa Police Drug Disposal: गोवा पोलिस दलाच्या ‘ड्रग्ज डिस्पोजल कमिटी’ने विविध १८ गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला तब्बल ४६.३६३ किलो अमलीपदार्थांचा साठा नष्ट केला आहे.
Goa Police Drug Disposal
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पोलिस दलाच्या ‘ड्रग्ज डिस्पोजल कमिटी’ने विविध १८ गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला तब्बल ४६.३६३ किलो अमलीपदार्थांचा साठा नष्ट केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या नष्ट केलेल्या अमलीपदार्थांची किंमत सुमारे २ कोटी २ लाख ३५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कुंडई औद्योगिक वसाहतीमधील ‘बायोटिक वेस्ट सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या उच्च-तापमान भट्टीमध्ये ही सर्व अमलीद्रव्ये सुरक्षितपणे जाळून नष्ट करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई गोवा राज्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्या उपस्थितीत पार पडली.

Goa Police Drug Disposal
Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

तसेच, या प्रक्रियेवर ड्रग्ज डिस्पोजल कमिटी उपमहानिरीक्षक (एएनसी) आणि अध्यक्ष वेद प्रकाश सूर्या, पोलिस अधीक्षक (एएनसी) आणि सदस्य सुनीता सावंत, पोलिस अधीक्षक (पोलिस मुख्यालय) आणि सदस्य तुषार वेर्णेकर व संचालक, अन्न आणि औषध प्रशासन आणि सदस्य श्वेता देसाई यांची उपस्थिती होती.

‘एनडीपीएस’ची अंमलबजावणी सुरूच राहील!

या मोहिमेदरम्यान कायदेशीर पारदर्शकता राखण्यासाठी स्वतंत्र पंच, अधिकृत अधिकारी आणि अँटी नार्कोटिक्स सेलचे कर्मचारी उपस्थित होते. नशामुक्त आणि सुरक्षित गोवा घडवण्यासाठी पोलिस दल यापुढेही ‘एनडीपीएस’ कायद्याची कठोर अंमलबजावणी करत राहील, असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com