

म्हापसा: पोलिसांनी आज कळंगुट आणि हणजूण येथे मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचा पर्दाफाश केला. हणजूण येथील माया रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या एका बनावट कॉल सेंटरवर सोमवारी मध्यरात्री छापा टाकून तब्बल १५ जणांना अटक केली.
तसेच बागा येथे ‘हॉटेल बागा रेसिडेन्सी’च्या चौथ्या मजल्यावर सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून १९ जणांना रंगेहात पकडले. कळंगुट येथील कारवाईत १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
हे संशयित ‘आयओएस’चे कस्टमर सर्व्हिस एजंट असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत होते. २९ जून रोजी रात्री ११.२० ते ३० जूनच्या पहाटे ०२.३० च्या सुमारास हणजूण येथील माया रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक साहील वारंग यांनी याप्रकरणी सरकारतर्फे तक्रार नोंदविली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.