Fake Call Center Bust: गोव्यात गिफ्ट कार्ड्स अन् डॉलर्सचा काळाबाजार! वेरेतील आलिशान बंगल्यातून चालणारं बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त; 9 जणांना बेड्या

Saligao Police Raid: उत्तर गोव्यातील वेरे-बार्देश येथील एका बंगल्यातून चालणारे बनावट कॉल सेंटर साळगाव पोलिसांनी उद्ध्वस्त केले.
Saligao Police Raid
Saligao Police RaidDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: उत्तर गोव्यातील वेरे-बार्देश येथील एका बंगल्यातून चालणारे बनावट कॉल सेंटर साळगाव पोलिसांनी उद्ध्वस्त केले. अमेरिकन नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवून आणि तांत्रिक मदतीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ९ आंतरराज्यीय संशयितांना अटक करण्यात आली असून ते सध्या पोलिस कोठडीत आहेत.

साळगाव पोलिसांनी २४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे २.५९ वाजता ‘जोईस पॅलेस’ येथे छापा टाकून ही कारवाई केली. संशयितांनी येथे अनधिकृत कॉल सेंटर सुरू केले होते. लॅपटॉप आणि खासगी नेटवर्कचा वापर करून ते अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधत असत. स्वतःला ‘बँक ऑफ यूएसए’चे अधिकारी असल्याचे भासवून ते स्वस्त दरात कर्ज किंवा ॲपल सॉफ्टवेअर साहाय्य देण्याचे आमिष दाखवत असत. यानंतर विविध कारणांनी नागरिकांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड्स किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पैसे उकळले जात होते. ही रक्कम नंतर भारतीय चलनात रूपांतरित करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरली जात होती.

Saligao Police Raid
Fake Call Center : माजोर्डातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

रॅकेट उघड

साळगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या सायबर फसवणुकीच्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड झाला असून, तपास सुरू आहे.

Saligao Police Raid
व्हॉट्सॲप कॉल अन् CBI ची धमकी! 90.85 लाख उकळणारा केरळचा 21 वर्षीय भामटा जेरबंद; गोवा पोलिसांकडून 'डिजिटल अरेस्ट'चा पर्दाफाश

अटक केलेले असे...

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये संदीप कुमार (अहमदाबाद, गुजरात), आकाश शाहू काळे (मुंबई, महाराष्ट्र), कविश थारीवाला (अहमदाबाद, गुजरात), अक्षय नायर (कल्याण, ठाणे), हिरेन भयानी (मालाड, मुंबई), अजय किशोर दास (कोलकाता, पश्चिम बंगाल), तन्मय पवार (कांदिवली, मुंबई), विकिहो शोहे व ल्होशेटो रोचिल (दिमापूर, नागालँड) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com