Goa Police Attack: पोलिसांवरील हल्ल्यामुळे काँग्रेसला चिंता, कारवाईची मागणी; मुरगाव पोलिस उपअधीक्षकांची घेतली भेट

Police Attack: अमित पाटकर यांनी पक्षाच्या इतर सदस्यांसमवेत बुधवारी वास्को पोलिस ठाण्यात मुरगावचे पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
Goa Police Attack
Goa Police AttackDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : पोलिस हल्ल्याच्या घटनेबद्दल प्रदेश काँग्रेसने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्षाच्या इतर सदस्यांसमवेत बुधवारी वास्को पोलिस ठाण्यात मुरगावचे पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

या घटनेबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली. पाटकर यांनी अशा घटना पोलिस दलाची प्रतिमा मलिन करतात, असे यावेळी सांगितले.

१९ ऑगस्ट रोजी पहाटे वाडे येथील किंग्स्टन प्लाझाजवळ तरुणांच्या गटाने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचा दावा काँग्रेसने केला. पाटकर यांनी सरकार तसेच स्थानिक आमदारांवर टीका केली.

Goa Police Attack
Sachin Tendulkar In Goa: 'क्रिकेटचा देव' गोव्यात! काणकोण येथील 'क्रीडा आंगण' सभागृहाचं सचिनच्या हस्ते होणार उद्घाटन

पाटकर म्हणाले की, लोकांचे तसेच महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या पोलिसांवर तरुणांच्या गटाकडून हल्ला केला जातो, हे लज्जास्पद आहे. गणवेशधारी पोलिस कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याने जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे, असे ते म्हणाले.

कॉन्स्टेबलसह पोलिस जीप एका आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असता दारू पिऊन रस्ता अडवणाऱ्या तरुणांच्या गटाने जीपमधील पोलिसांवर हल्ला केला. ही घटना भयानक असून वास्कोमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे यातून दिसून येते, असे पाटकर म्हणाले. नंदादीप राऊत यांनी अशा घटना वारंवार घडत आहेत, याबाबत चिंता व्यक्त केली.

Goa Police Attack
Goa Comunidade Land: 'कोमुनिदादवरील घरे कायदेशीर'चे ते विधेयक तत्काळ रद्द करा! आमदार व्हिएगश यांची राज्‍यपालांकडे मागणी

प्रकरण दडपू नये : पाटकर

पोलिस अधिकाऱ्यांना आपण हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेण्याची विनंती केली आहे. या घटनेत एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला गंभीर दुखापत झाली असती किंवा त्याला आपला जीव गमावला असता तर याला जबाबदार कोण असता? पोलिसांनी हे प्रकरण दाबून ठेवू नये किंवा राजकीय दबावापुढे झुकू नये.

उपलब्ध व्हिडिओ फुटेजचा सशक्त पुरावा म्हणून वापर करावा आणि एक अतिशय मजबूत खटला सुरू करावा, जेणेकरून उघडपणे पोलिसांवर हल्ला करणाऱ्या या गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल, असे पाटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com