Land Grabbing : जमीन हडप प्रकरणात मोहम्मद सुहैलला तब्बल सहाव्यांदा अटक

म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाकडून सुहैलला 6 दिवसांची पोलीस कोठडी
Land Scam
Land ScamDainik Gomantak

गोव्यातील जमीन हडप प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या घोटाळ्यातील आरोपी असलेल्या मोहम्मद सुहैल उर्फ मायकल याला तब्बल सहाव्यांदा अटक करण्यात आली आहे. म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयाकडून आरोपी सुहैलला 6 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यातील जमीन हडपप्रकरणी तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांभोवतीचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे.

पुराभिलेख खात्यातील फोंडा येथील महेश नाईक आणि धीरेश नाईक यांच्यासह फोंडा येथील व्यावसायिक अनिल नाईक याला अटक केली होती. त्यामुळे पुराभिलेख कार्यालयातील अटक केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या तीन झाली आहे.

संशयित धीरेश याला यापूर्वीही अटक झाली असून ही दुसरी कारवाई आहे. आतापर्यंत बनावट दस्तावेज तयार करून देणारे काही सरकारी नोटरीही पोलिसांच्या रडारवर आहेत.

पुराभिलेख खात्यातील जमीन नोंदणीसंदर्भातील दाखल्यांची पुस्तिका संशयित धीरेश आणि महेश हे अनिल नाईक याला नेऊन देत होते. त्यातील अनेक दाखले पुस्तिकेतून गायब झाले होते. त्यामध्ये या त्रिकुटांचा हात असल्याचे केलेल्या चौकशीत उघड झाले होते. कळंगुट येथील ज्युलिएट फर्नांडिस यांनी बार्देश मामलेदार कार्यालयात त्यांची जमीन हडपल्याची तक्रार दिली होती.

Land Scam
Accident : कारचालक महिलेची दुचाकीला धडक; पणजीत अपघात

तक्रारीमध्ये 19 जुलै 2022 पूर्वी संशयित अंतोनिटा फर्नांडिस, सँड्रिक फर्नांडिस, मारिया फर्नांडिस, रावजी पाटील, सुनील गोयल तसेच बार्देश मामलेदार या सहाजणांनी संगनमत करून बोगस दस्तावेज तयार करत कळंगुट येथील सर्वे क्रमांक 26/9 व 476/2 मधील जमीन हडप केल्याचा दावा केला होता. हा प्रकार मामलेदार कार्यालयात फर्नांडिस यांनी आपल्या जमिनीची चौकशी केली असता निदर्शनास आला. याप्रकरणी एसआयटीने फसवणूक व कटकारस्थानचा गुन्हा दाखल केला होता.

एसआयटीकडे सुमारे दीडशेहून अधिक जमीन हडप प्रकरणे आली आहेत. त्यापैकी 46 प्रकरणे गुन्हे नोंद करून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणांमध्ये 21 जणांना अटक झाली होती. गेल्या आठवड्यात काणकोणचे माजी उपनिबंधक प्रेमानंद देसाई यांना अटक झाली होती. न्यायालयाने त्याला एक लाखाच्या वैयक्तिक हमीवर दोन 50 हजारांच्या हमीदारावर जामीन दिला आहे.

गेल्या 31 डिसेंबरला ते निवृत्त होण्यापूर्वी बार्देशचे उपनिबंधक होते. त्यांना निवृत्तीच्या आदल्या दिवशी एसआयटीने अटक केली होती. या जमीन हडप प्रकरणामध्ये महम्मद सुहैल या मास्टरमाईंड असून आतापर्यंत त्याला सहा गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे. जामिनावर असलेल्या त्याच्या दोन साथीदारांनी न्यायालयात माफीचा साक्षीदारसाठी अर्ज केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com