Art Of Goa: ...यामुळे 'पुढील वर्षापासून कलावृद्धी पुरस्कार देणार !' सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा

पुढच्या वर्षी पासून 45 ते 59 वयोगटातील कलाकारांना कलावृद्धी पुरस्कार देण्यात येतील, अशी घोषणा कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केली.
Award Function | Goa News
Award Function | Goa News Dainik Gomantak

Art Of Goa: पुढच्या वर्षी पासून 45 ते 59 वयोगटातील कलाकारांना कलावृद्धी पुरस्कार देण्यात येतील, अशी घोषणा कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केली.संस्कृती भवन मध्ये झालेल्या कला गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

व्यासपीठावर संस्कृती खात्याचे सचिव मिनिनो डिसोझा, कला संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप,उपसंचालक अशोक परब उपस्थित होते., प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संगीत,साहित्य, नाटक, तियात्र अशा विविध कला क्षेत्रात योगदान दिलेल्या 31 कलाकारांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र व रोख 25 हजार रुपये असे त्याचे स्वरूप होते.

Award Function | Goa News
Republic Day: अतिरेक्यांपासून सावधानता बाळगण्यासाठी गोवा पोलिस अर्लट मोडवर

हे पुरस्कार म्हणजे शाबासकीची थाप व जबाबदारी आहे, असे सांगून गोविंद गावडे म्हणाले, पोर्तुगीज राजवटीत आपली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले तेव्हा या कलाकारांनी ती जपून ठेवली. कलेचे मोल पैशात करता येणार नाही.

कला व संस्कृती सचिव मिनिनो डिसोझा यांनी सांगितले,की कला गौरव पुरस्कार हा कलाकारांच्या कार्याची दखल घेऊन दिला जातो. पुरस्कार हा पैशाचा मुद्दा नाही, पण ती ओळख आहे.

सत्कारमूर्ती रमेश वंसकर यांनी 45 ते 59 वयोगटातील कलाकारांना पुरस्कार योजना नसल्याने त्यांच्यासाठी सुरू करावी, अशी सूचना केली व ती मंत्री गावडे यांनी उचलून धरली.यावेळी सत्कारमूर्ती हुकूम दे सांताक्रुझ, राजेश नार्वेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सगुण वेळीप यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये व प्रदीप नाईक यांनी केले.

Award Function | Goa News
Goa PWD Workers: सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी PWD कर्मचारी रस्त्यावर...

कला गौरव पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. जे कार्य केले त्याला मंजुरी म्हणजे हा पुरस्कार. पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी वाढते तसेच इतरांना प्रेरणाही मिळते. -जाॅन आगियार, सत्कारमूर्ती

कलाकाराला पैसा नको असतो तर हवा असतो मान. पुरस्कार मिळाल्यामुळे एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. लहान मुलांमध्ये कला भरपूर आहेत. बालकलाकारांचे कौतुक करून त्यांच्या कलेकरिता पुरस्कार द्यावा. - शैलेंद्र रायकर, सत्कारमूर्ती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com