Goa Crime 2024: 29 खून, 9.81 कोटींचे ड्रग्ज जप्त; गोव्यात सरत्या वर्षात लैंगिक अत्याचाराच्या 106 घटना

Goa Crime Cases In 2024: आयपीसी कलमांतर्गत राज्यात २०९६ घटनांची नोंद झाली पैकी १,८४४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
Goa Crime 2024: 29 खून, 9.81 कोटींचे ड्रग्ज जप्त; गोव्यात सरत्या वर्षात लैंगिक अत्याचाराच्या 106 घटना
Goa Crime Cases In 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात २०२४ वर्षात २९ खूनाच्या घटना नोंद झाल्या आहेत. तसेच १०६ बलात्कार, ०३ दरोडा, १३ चोरी आणि २९ खुनाच्या प्रयत्नाच्या घटना नोंद झाल्या आहेत. अमली पदार्थ विरोधी कारवाईच्या १५९ घटनांमध्ये गोव्यात तब्बल ९.८१ कोटी रुपये किंमतीचे २७५ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी १८८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली.

गोव्यातील २०२४ मधील गुन्ह्यांची यादी

गोव्यात २९ डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण १८० गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी १७४ प्रकरणांचा छडा लागला आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचा दर ९६.६७ टक्के असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आयपीसी कलमांतर्गत राज्यात २०९६ घटनांची नोंद झाली पैकी १,८४४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

Goa Crime 2024: 29 खून, 9.81 कोटींचे ड्रग्ज जप्त; गोव्यात सरत्या वर्षात लैंगिक अत्याचाराच्या 106 घटना
Calangute Murder: गोव्यात वर्षाचा शेवटही रक्तरंजित; कळंगुटमध्ये आंध्र प्रदेशच्या पर्यटकाचा खून

२७५ किलो अमली पदार्थ जप्त

राज्यात २७४.९३३ किलो ग्रॅम वजनाचे ९ कोटी ८१ लाख ९३ हजार ६४७ किंमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी १५९ प्रकरणात १८८ जणांना अटक केली. यापैकी ५४ गोमंतकीय, १११ बिगर गोमंतकीय आणि २३ विदेशी आहेत.

Goa Crime 2024: 29 खून, 9.81 कोटींचे ड्रग्ज जप्त; गोव्यात सरत्या वर्षात लैंगिक अत्याचाराच्या 106 घटना
Goa Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भंगारअड्डा चालक सादिक खानला अटक

पर्यटक पोलिसांकडून २५ ए अंतर्गत २४२ दलाल किंवा एजंट्स तर २६ अंतर्गत ७१ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच, बीचवर वाहन चालवणे (०८), कचरा फेकल्याप्रकरणी (९१०), बीचवर दारु पिणे (१८५) आणि १३९ जणांना समुद्रात बुडण्यापासून वाचविण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com