Goa ANC Raid: पाच किलो गांजासह उत्तरप्रदेशच्या तरूणास अटक; अँटी नार्कोटिक सेलचा पणजीत छापा

दिवजा सर्कल येथे ही कारवाई
Goa Anti Narcotic Cell Raid:
Goa Anti Narcotic Cell Raid:Dainik Gomantak

Goa Anti Narcotic Cell Raid: गोवा पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलने रविवात्री रात्री उशिरा केलेल्या कारवाईत तब्बल पाच किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गोवा पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलने ही कारवाई केली. यात उत्तर प्रदेशच्या एका तरूणास अटक करण्यात आली आहे.

Goa Anti Narcotic Cell Raid:
Crocodile in Vaddem Vasco: वाड्डे वास्को येथे 7 फुटी मगरीचा वावर; स्थानिकांमध्ये घबराट, पाहा व्हिडिओ...

रविवारी रात्री उशिरा पणजीतील दिवजा सर्कल येथे ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपी अजित अशोक कुमार (वय 24) हा तरूण संशयास्पद वावरताना दिसला. तो मूळचा उत्तरप्रदेशातील जौनपूरचा रहिवासी आहे.

त्याच्याकडे चौकशी केली असता आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 5 किलो गांजा आढळून आला. तो जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

या छाप्याचे नेतृत्व पोलिस उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी केले. या पथकात हेड कॉन्स्टेबल उमेश देसाई, नितेश मुळगावकर, संदेश वळवईकर आणि मंदार नाईक, पोलिस निरीक्षक सजिथ पिल्लई यांचा समावेश होता.

डीवायएसपी नेरलॉन अल्बुकर्क आणि एएनसी विभागाचे एसपी शिवेंदू भूषण यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका गारोडी करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com