Goa Police: हणजुणे वाहतूक पोलिसांमुळे दिल्लीच्या पर्यटक जोडप्याच्या चेहऱ्यावर उमटले हासू

महागडा मोबाईल पोलिसांनी तासाभरात दिला शोधून
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: दिल्लीतून गोव्यात मोठ्या हौशेने पर्यटनासाठी आलेल्या एका जोडप्याचा महागडा मोबाईल हणजुणे येथे हरवला होता.

तथापि, हणजुणे वाहतूक पोलिसांतील कर्मचारी कृष्णा पालयेंकर, सखाराम वेंगुर्लेकर आणि विश्राम मळीक यांनी हा फोन शोधून दिला. त्यामुळे या पर्यटक जोडप्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटले.

गोव्यातून पर्यटनाच्या चांगल्या आठवणींसोबत या पर्यटक जोडप्याला महागडा मोबाईल हरविल्याची बोचही सोबत घेऊन परतावे लागणार होते. तथापि, या जोडप्याने हणजुणे पोलिसात संपर्क साधला होता.

Goa Police
Mumbai-Goa Highway: नितीन गडकरींनी घेतली जबाबदारी; म्हणाले- मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास मीच जबाबदार...

त्यांचा आयफोन हरविल्याची माहिती त्यांनी पोलिसांत दिली होती. वाहतूक पोलिसांना हा फोन रस्त्यात सापडला. त्यांनी संबंधित जोडप्याकडे खात्री करून फोनची ओळख पटवून तो त्यांना परत केला.

यानंतर या पर्यटकाने ट्विट करत याबाबत गोवा पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत हरवलेला मोबाईल तासाभरात शोधून दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

कुणाल अहुजा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, हणजुणे पोलिसांत मोबाईल हरविल्याचे सांगितल्यावर त्यांनी तासाभरात तासाभरात माझा हरवलेला आयफोन शोधून दिला. यात रुपेश यांनी तत्परता दाखवली.

त्यांच्या कामाने, कार्यक्षमतेने मी पूर्णपणे प्रभावित झालो आहे. पोलिसांनी अतिजलद कारवाई केली. अत्यंत सभ्य आणि विनम्र अशा पोलिसांचे कौतूक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com