Goa Police: डॉम्निक डिसुझा याच्यावर तडीपारीची कारवाई होणार? पोलिस अधीक्षक वाल्सन यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

फसवणूक करून बेकायदा धर्मांतरण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी केलीय अटक
Goa Police on Dominic Dsouza
Goa Police on Dominic DsouzaDainik Gomantak

Goa Police: फसवणूक व बेकायदेशीर धर्मांतरण घडवून आणण्याच्या आरोपाखाली सडये-शिवोली येथील फाइव्ह पिलर्स चर्चचे धर्मगुरू डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी तिसऱ्यांदा अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोव्यात हे प्रकरण चर्चेत आहे.

दरम्यान, आता उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यानी डिसोझा याच्यावर सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी तडीपारीची कारवाई व्हावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी देताच डिसोझा याला जिल्ह्यातून तडीपार केले जाईल.

Goa Police on Dominic Dsouza
Goa Crime News: धक्कादायक! दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेला चक्क परतला घरी; मग ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले तो कुणाचा?

निधीन वाल्सन यांनी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिवोलीतील पास्टर डॉम्निक डिसोझा आणि त्याच्या पत्नीवर तडीपारीची कारवाई करावी. त्यांनी धर्माच्या नावावरून येथील सामाजिक शांततेला बाधा निर्माण केली आहे.

डॉम्निक यास म्हापसा पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली. मात्र आज (4 जानेवारी) म्हापसा न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

डॉम्निक डिसोझा याने फोंडा येथील 40 वर्षीय इसमाला धर्मांतरासाठी धमकावले. तसेच फिर्यादीस संशयितांनी सांगितलेला आणि प्रचारित केलेला धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवले, असेही कथित आरोप तक्रारीत करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com