Goa News: पोळे किनाऱ्यावरील पारंपरिक पायवाटा पूर्ववत करा!

Goa News: पोळे किनाऱ्यावर अनधिकृतपणे पदपूल बांधण्यात आला आहे.
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: लोलये-पोळे पंचायतीची ग्रामसभा पोळे किनाऱ्यावरील प्रश्नांनी गाजली. पोळे किनारा हा पर्यटनासाठी विकसित करण्यासाठी एका गटाकडून मागणी होत असतानाच दुसऱ्या गटाकडून कालच्या ग्रामसभेत वेगवेगळे प्रश्न व समस्यांची सरबत्ती पंचायत मंडळावर करण्यात आली.

आनंद पागी व दीपक पागी यांनी पोळे (Pole) येथे किनाऱ्यावर जाणारी पारंपरिक पायवाट जमिनदाराने अडवली आहे. तसेच धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या पारंपरिक पायवाटाही अडविण्यात आल्या आहेत. या पायवाटा पूर्ववत सुरू कराव्यात. त्याचप्रमाणे या किनाऱ्यावर अनधिकृतपणे या ठिकाणी पदपूल बांधण्यात आला आहे.

Goa News
Goa Government: सार्वजनिक व्यवहार क्रमवारीत गोवा चौथा; राजकीय न्यायामध्ये मिळालं शेवटचं स्थान

दरम्यान, त्यामुळे भरतीचे पाणी अडून राहत असल्याने त्याचा परिणाम जवळच्या घरांवर होत आहे. किनाऱ्यावर अनधिकृतपणे सिमेंट काँक्रीटची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांना होड्या किनाऱ्यावर आणणे कठीण बनले आहे अशी समस्या मांडल्या.

तसेच, यावेळी सरपंच प्रतिजा बांदेकर व पंच अजय लोलयेकर यांनी यासंदर्भात पंचायत मंडळाची बैठक घेऊन जमीनमालक व तक्रारदार यांना बरोबर घेऊन सर्व्हेक्षण करण्यात येऊन सामंजस्याने सर्व प्रश्न सोडविण्यात येतील असे सांगितले.

पंचायत क्षेत्रात मेगा प्रकल्पांना मान्यता देताना त्याची माहिती ग्रामस्थांना देऊनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रशांत पागी यांनी केली. यासंदर्भात पंचायत क्षेत्रात कोणत्याही प्रकल्पांना मान्यता देताना ग्रामसभेत हा विषय चर्चेला घेण्याची मागणी केली.

Goa News
Goa Illegal Construction: मांद्रे पंचायत क्षेत्रात अवैध बांधकामांना थारा नाही- अमित सावंत

'पंचायत कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधू नये'

नवनिर्वाचित पंचायत मंडळाची स्थापना व सरपंचाची निवड झाल्यानंतर पंचायत (Panchayat) कार्यालयात भाजपचा फलक लावण्यात आला, हे बरोबर नाही. पंचायत कोणत्याच पक्षाच्या दावणीला बांधू नये अशी भूमिका समीर नाईक यांनी ग्रामसभेत मांडली.

पंचायत ही ग्रामस्थांची आहे, ती कोणत्याच पक्षाची असू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात सरपंच प्रतिजा बांदेकर व पंच अजय लोलयेकर यांनी दिलगिरी व्यक्त करून यापुढे अशी चूक पुन्हा होणार नसल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com