Goa Illegal Construction: मांद्रे पंचायत क्षेत्रात अवैध बांधकामांना थारा नाही- अमित सावंत

Goa Illegal Construction: सर्व बांधकामांचा सर्वे पंचायत मंडळ करणार आहे.
Goa Illegal Construction | Amit Sawant
Goa Illegal Construction | Amit SawantDainik Gomantak

Goa Illegal Construction: मांद्रे पंचायत क्षेत्रात कोणत्याच प्रकारच्या बेकायदा बांधकामांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा सरपंच अमित सावंत यांनी मांद्रे ग्रामसभेत रविवारी दिला. पंचायतीचा महसूल वाढवण्यासाठी क्षेत्रातील आस्थापने, गेस्ट हाऊस, रेस्ट हाऊसकडून महसूल गोळा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मांद्रेची ग्रामसभा पंचायत सभागृहात अमित सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पंचायत क्षेत्रातील टॉवर मालकाकडून महसूल घ्यावा, बेकायदा डोंगर कापणी किंवा रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवणे, सार्वजनिक स्मशानभूमी, ध्वनी प्रदूषण रोखणे, कचरा प्रश्‍न तसेच आजोबा मंदिर परिसरातील बेकायदा बांधकाम (Construction) थांबवणे आदी विषयांवर गरमागरम चर्चा झाली. तसेच किती घरांना क्रमांक दिले आणि किती दुकाने आस्थापने पंचायत क्षेत्रात आहेत, यावर चर्चा झाली.

Goa Illegal Construction | Amit Sawant
Goa News: चित्रापूर मठाचा रहिवासी दाखला रद्द करा!

दरम्यान, यावेळी उपसरपंच तारा हडफडकर पंच प्रशांत नाईक, महेश जनार्दन कोनाडकर ,राजेश विनायक मांद्रेकर, मिशेल शेरॉन अमरोज फर्नांडिस, किरण अर्जुन सावंत रॉबर्ट फर्नांडिस, चेतना पेडणेकर , मिंगेल फर्नांडिस संपदा आसगवकर आदी पंच उपस्थित होते. पंचायत सचिव अमित प्रभू यांनी मागच्या सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम केला.

गावातील लोकांनाच पंधरा-पंधरा दिवस नळाला केवळ एक बादली सुद्धा पाणी मिळत नाही. तर या जलतरण तलावाला प्रकल्पाधिकारी पाणी कुठून आणणार, असा सवाल गोवेकर यांनी केला. श्री आजोबा मंदिर परिसरात व सातेरी मंदिर परिसरात मंदिर जवळच बेकायदा बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाविषयी देवस्थान समिती नागरिक पंचायत (Panchayat) मंडळ यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल,असे सरपंच अमित सावंत यांनी सांगितले.

Goa Illegal Construction | Amit Sawant
Goa Accident News: गिरि-महाराष्ट्र येथे महामार्गावर भीषण अपघात महाष्ट्रातील 8 प्रवासी जखमी

शंकर गोवेकर यांनी जुनसवाडा मांद्रे (Mandre) येथे सार्वजनिक स्मशानभूमी आहे का किंवा त्या समशानभूमीसाठी सरकारचा किती खर्च केला, असा सवाल उपस्थित केला. प्रसाद शहापूरकर, जगन्नाथ पार्सेकर, गोवेकर, गोविंद पार्सेकर, विश्वनाथ शिरोडकरआदींनी विविध समस्या ग्रामसभेत मांडल्या. उपसरपंच तारा हडफडकर यांनी आभार मानले.

ध्वनिप्रदूषण थांबवण्याची मागणी

रिवा रिसॉर्टमुळे परिसरात होणाऱ्या ध्वनि प्रदूषणामुळे रूग्णांना त्रास होतोच शिवाय लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात त्रास होतो.हे ध्वनिप्रदूषण कायमचे रोखावे, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.

अमित सावंत, सरपंच मांद्रे-

पंचायत क्षेत्रात काही जणांनी ठराविक बांधकामासाठी 'ना हरकत' घेऊन विस्तारित बांधकामे करून कायद्याचा भंग केलेला आहे. त्या सर्व बांधकामांचा सर्वे पंचायत मंडळ करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com