Curchorem sex scandal case
Curchorem sex scandal caseDainik Gomantak

Curchorem: कुडचडेतील 'सेक्‍स स्‍कँडल'ला फुटली वाचा! नगरसेवकाच्या मुलाला अटक; संतप्त लोक जमले पोलीस स्थानकाबाहेर

Curchorem sex scandal case: रात्री उशिरा कुडचडे पोलिस ठाण्‍याबाहेर मोठ्या संख्‍येने लोक जमले होते. सोहमला अटक करताच लोकांनी तीव्र भावना व्‍यक्‍त केल्‍या.
Published on

केपे: गेल्‍या काही दिवसांपासून कुडचडेत गाजत असलेल्‍या कथित ‘सेक्‍स स्‍कँडल’ प्रकरणी पारदर्शकपणे तपास करून संशयितावर कडक कारवाई करण्‍याची मागणी विविध राजकीय पक्ष व कुडचडे-काकोडा पालिकेच्‍या आठ नगरसेवकांनी पोलिसांकडे केली. रात्री उशिरा सोहम नाईक (२३, रा. काकोडा) या तरुणाला पोलिसांनी अटक केली.

सोहम हा नगरसेवक सुशांत नाईक यांचा पुत्र आहे. अल्‍पवयीन मुलींचे छायाचित्रण करण्‍यासह छायाचित्रे समाजमाध्‍यमांवर व्‍हायरल केल्‍याचा ठपका ठेवत ‘आयटी ॲक्‍ट’नुसार कारवाई करण्‍यात आली आहे, अशी माहिती कुडचडे पोलिसांनी दिली. रात्री उशिरा कुडचडे पोलिस ठाण्‍याबाहेर मोठ्या संख्‍येने लोक जमले होते. सोहमला अटक करताच लोकांनी तीव्र भावना व्‍यक्‍त केल्‍या.

कथित ‘सेक्‍स स्‍कँडल’ची संपूर्ण दक्षिण गोव्‍यात चर्चा सुरू होती. काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर, आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांच्‍यासह भाजप नेते रोहन गावस देसाई वा, अशी आज मागणी केली होती.

याबाबत काही नगरसेवकांसह स्‍थानिकांनीही कुडचडे पोलिसांशी संपर्क साधून संबंधित मुलाचा तत्‍काळ शोध घेण्‍याची आणि त्‍याच्‍यावर कारवाई करण्‍याची मागणी केली होती. परंतु, याबाबत कोणतीही तक्रार नोंद न झाल्‍याने कारवाई कशी करायची? असा प्रश्‍‍न पोलिसांसमोर उभा राहिला. दरम्‍यान, या विषयाला वाचा फोडणारा एक जबाब नोंदवल्‍यानंतर पोलिसांनी अल्‍पवयीन मुलींचे छायाचित्रण करण्‍यासह छायाचित्रे समाजमाध्‍यमांवर व्‍हायरल केल्‍याप्रकरणी सोहम नाईकला बेड्या ठोकण्‍यात

आल्‍या. दरम्यान, कुडचडेत सध्या चर्चेत असलेली तसेच अल्पवयीन मुलाशी संबंधित असलेली घटना अत्यंत चिंताजनक व अस्वस्थ करणारी आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी नि:पक्षपातीपणे तपास करावा आणि पीडितांना न्याय द्यावा. कुडचडेची अशा पद्धतीने बदनामी करणाऱ्यांचा तीव्र शब्दांत निषेध असल्याचे रोहन गावस देसाई यांनी सांगितले.

प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा : नगरसेवकांची मागणी

कुडचडे–काकोडा पालिकेतील एकूण पंधरा नगरसेवकांपैकी सात जणांना मुले आहेत. त्‍यामुळे स्‍थानिक नागरिक प्रत्‍येक नगरसेवकाकडे त्‍याच नजरेने पाहत! त्‍यामुळे संबंधित नगरसेवकांनी या प्रकरणाचा तत्‍काळ सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी कुडचडे पोलिसांकडे केली होती.

रविवारी नगराध्‍यक्ष प्रमोद नाईक यांच्‍यासह आठ नगरसेवक व काही स्‍थानिकांसह कुडचडेचे पोलिस निरीक्षक मेल्‍सन कुलासो यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून यात गुंतलेल्या मुलाला तत्‍काळ अटक करण्याची मागणी केली. त्‍याचवेळी या प्रकरणात कुडचडे पोलिस गांभीर्याने तपास करीत नसल्याचा आरोपही काही जणांनी केला होता.

Curchorem sex scandal case
Crime News: माणुसकीला काळिमा! 90 वर्षीय 'आजी'वर 4 नराधमांकडून सामूहिक अत्याचार; तोंडात कापडाचा बोळा कोंबून केलं पाशवी कृत्य

तक्रार करा, नाव गुप्‍त ठेवू : उपअधीक्षक

कुडचडे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलेला आहे. परंतु, आतापर्यंत एकही तक्रारदार मुलगी समोर आलेली नाही, अशी माहिती कुडचडेचे निरीक्षक मेल्‍सन कुलासो यांनी दिली. तर, या प्रकरणातील पीडितांनी तक्रार नोंदवल्‍यास त्‍यांच्‍याबाबतची माहिती गुप्त ठेवण्‍यात येईल. पीडितांनी पुढे येऊन तक्रारी नोंद कराव्‍या, असे आवाहन उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांनी केले.

Curchorem sex scandal case
Goa Crime: महिलेला पाठवले अश्लील फोटो, संदेश! फोनवर केली लैंगिक सुखाची मागणी; न्यायालयाने फेटाळला दोषमुक्तचा अर्ज

अनेक मुलींना केले ब्‍लॅकमेल?

१.कुडचडेतील एका नगरसेवकाचा अल्‍पवयीन मुलगा ‘सेक्‍स स्‍कँडल’मध्‍ये सहभागी असल्‍याच्‍या चर्चेने दक्षिण गोव्‍यात खळबळ माजली होती.

२. ‘त्‍या’ मुलाने आलिशान कारद्वारे अनेक युवतींना मोहित करून त्‍यांच्‍याशी शारीरिक ‘लगट’ केली व त्‍यातील काही युवतींचे फोटो व्‍हायरल केल्‍याची चर्चा आहे.

३.संबंधित युवक हा पीडितांना ब्‍लॅकमेल करायचा, अशी माहितीही समोर आली आहे. तपासात धक्‍कादायक माहिती पुढे येण्‍याची शक्‍यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com