Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत दर स्थिर, दक्षिण गोव्यात मात्र वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डीझेलचे आजचे दर

पेट्रोलियम उत्पादनांच्या जागतिक दरांचा देशांतर्गत दरांवर होतो परिणाम
Petrol Diesel Prices In Goa
Petrol Diesel Prices In GoaDainik Gomantak

Goa Petrol-Diesel Price: गोवा आण उत्तर गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या किंमतींमध्ये गुरूवारी 20 एप्रिल रोजी कोणताही बदल झाला नाही. हे दर बुधवार इतकेच राहिले. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल दरात प्रतीलीटर 19पैशांची वाढ झाली.

उत्तर गोवा आणि पणजीतील डीझेल दरांमध्येदेखील काहीही वाढ झाली नाही. हे दर बुधवार इतकेच राहिले. तर दक्षिण गोव्यातील डीझेल दरामध्ये प्रतीलीटर 18 पैशांची वाढ झाली.

जागतिक स्तरावरील क्रुड ऑईलच्या दरांमध्ये होणाऱ्या बदलांवरून तेलकंपन्या दररोज पेट्रोल-डीझेल या इंधन दरांत बदल करतात. त्यामुळे दररोज या इंधन दरांमध्ये चढ उतार होत असतात.

Petrol Diesel Prices In Goa
Transfer Of Agriculture Land: नवीन कायदा शेतकरीविरोधी!

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.68

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 90.23

Petrol Diesel Prices In Goa
Nilesh Cabral: कुडचडे, बागा येथे ध्वनी, धूळ प्रदूषण मापक यंत्रणा कार्यान्वित

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com