Sunburn Festival Goa: सनबर्न ठिकाणावरुन वाद पेटला, तर कंपनीने तारखा जाहीर करत तिकीट विक्रीही केली सुरू

पेडणेकरांना सनबर्न नको: लोबो म्हणतात पार्टी किनारी भागातच हवी
Sunburn Festival Goa 2023
Sunburn Festival Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Sunburn Festival Goa सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात होणारी सनबर्न पार्टी कुठे व्हावी? यावरून आता हेवेदावे सुरू झाले आहेत.

सनबर्न पार्टी नव्याने उभारलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न असून पेडणेकरांना ती नको आहे, तर ही पार्टी किनारपट्टीतच व्हावी अशी मागणी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे. त्यामुळे पूर्वीपासून वादग्रस्त बनलेल्या या पार्टीवरून नवा वाद उपस्थित झाला आहे.

राज्यात यापूर्वी अनेक कारणांनी वादग्रस्त बनलेली सनबर्न यंदा मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात 28 ते 31 डिसेंबर दरम्यान घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.

अर्थात कंपनीने तारखा जाहीर करत 4 हजार रुपयांची तिकीट विक्री सुरू केली आहे. गोव्यातील ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल असेही म्हटले आहे.

यावर गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी सरकारवर आक्रमकपणे टीका करत सरकार जीएमआर या खासगी कंपनीला मदत करत असल्याचा आरोप केला आहे.

चतुर्थीच्या तोंडावर कळंगुट पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या कुळ तपासणी मोहिमेचे आमदार लोबो यांनी स्वागत केले व अशा मोहिमा राज्यातील इतर भागातही पोलिसांनी सुरू करण्याचे आवाहन केले.

आपण आमदार या नात्याने याबाबतीत पोलिसांना सर्वप्रकारचे सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक व त्यांची टीम याबाबतीत चांगली कामगिरी करत असल्याने चतुर्थीच्या तोंडावर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना आळा घालण्यास ही मोहीम उपयोगी पडणार असल्याचे लोबो यांनी सांगितले. यावेळी पर्राचे सरपंच चंदानंद हरमलकर उपस्थित होते.

Sunburn Festival Goa 2023
Accident in Dhargal: धारगळमध्ये दुचाकी-चारचाकीमध्ये टक्कर! अपघातात दोघेजण गंभीर जखमी

‘किनारी भागातच हवे सनबर्न’

सनबर्नसारख्या भव्य संगीत पार्ट्या किनारी भागातच होणे पर्यटनाच्या दृष्टीने योग्य असल्याचे मत आमदार लोबो यांनी व्यक्त केले आहे. पर्यटक मग ते देशी असोत अथवा विदेशी, सर्वप्रथम येथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीच राज्यात ते येत असतात.

त्याला जोडूनच सनबर्नसारख्या संगीत पार्ट्या त्यांच्या आनंदात भर टाकतात. राज्यातील किनारी भागातच अशा संगीत पार्ट्या पर्यटकांची अधिक पसंती असते हे आत्तापर्यंतच्या कार्यक्रमांतून सिद्ध झालेले आहे.

पेडणे तालुक्यातील मोपासारख्या दुर्गम भागात सनबर्नसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा घाट सरकारने घालू नये त्याचा विपरीत परिणाम पर्यटनावर होण्याची भीती आमदार लोबो यांनी व्यक्त केली.

Sunburn Festival Goa 2023
37th National Games News Update: गावडेंच्या कार्यपद्धतीवर केंद्रीय क्रीडामंत्री असमाधानी, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

‘पेडण्यात पार्टीचा उडेल फज्जा’

सनबर्नचा अर्थच निसर्गाच्या सान्निध्यात, भर उन्हात संगीत रजन्यांचा आनंद घेणे असा असून समुद्राच्या साक्षीने असे कार्यक्रम होत असल्याने आत्तापर्यंत लाखो पर्यटकांची अशा कार्यक्रमांना पसंती मिळाल्याचे लोबो यांनी सांगितले.

मोपासारख्या दुर्गम भागात जेथे कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत अशा ठिकाणी सनबर्नचे आयोजन केल्यास त्या कार्यक्रमांचा पुरता फज्जा उडणार असल्याची भीती लोबो यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com