Pernem News: रस्त्यावर गटारातले सांडपाणी, खड्डे आणि वाढलेली झाडेझुडपे; हद्दीच्या वादात पेडणेवासीयांच्या डोक्याला ताप

Goa News: पेडणे सार्वजनिक बांधकाम खाते व पेडणे नगरपालिका यांनी समन्वय साधून उपाययोजना करण्याची आवश्यकता
Goa News: पेडणे सार्वजनिक बांधकाम खाते व पेडणे नगरपालिका यांनी समन्वय साधून उपाययोजना करण्याची आवश्यकता
Goa PernemDainik Gomantak

पेडणेत गटारांची दुरुस्ती वेळेत झाली तरी सध्या त्या गटारांतून पावसाच्या पाण्याबरोबरच सांडपाणीही वाहत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तसेच या भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी वाढलेली झाडेझुडपे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या समस्या कधी सोडविल्या जातील, याचीच लोक वाट पाहत आहेत.

पेडणे नगरपालिका क्षेत्रात गटारांची दुरुस्ती आणि साफसफाईचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले. मात्र, शहरातील बहुतांश गटारांवर लाद्या घातलेल्या असल्याने बंद गटारांतून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे लोकांना त्रास होत आहे. पेडणे शहरातील पोर्तुगीजकालीन मासळी मार्केटजवळ ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.

चोपडे, मोरजी, हरमल या पेडणे तालुक्यातील मासळी विक्रेत्यांबरोबरच बार्देशमधील शिवोली, कोलवाळ अशा भागाबरोबरच शिरोडा, वेंगुर्ला, मालवणपर्यंतची मासळी येथे विक्रीला येते. या मासळीच्या तसेच चिकन, मटणाच्या सांडपाण्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था नाही. हे सगळे सांडपाणी गटारात जाते.

हा गटार सरळ बाजारातून जुन्या बसस्थानकापर्यंत जातो. गटार बंद असला तरी या मासळीच्या पाण्याची दुर्गंधी पसरते. अशाच प्रकारे पालिका क्षेत्रात काही ठिकाणी घरातील सांडपाणी गटारात सोडण्यात आले आहे. यामुळे रोगराईही पसरण्याची शक्यता आहे. खुद्द नगरपालिकेनेच कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई कुणावर करायाची आणि कुणी करायाची, असा प्रश्न उपस्थित होतो.

पेडणे मासळी मार्केटमधील सगळे सांडपाणी गटारात जाते. जुलै महिन्यात या मासळी मार्केटची ही जुनी इमारत पाडून याजागी नवीन प्रशस्त अशी इमारत बांधण्यास सुरू करणार आहोत. त्यात सांडपाणी निचऱ्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा असतील. यामुळे सांडपाण्याचा प्रश्न सुटेल, तर आवश्यक निधीअभावी रस्त्याच्या बाजूची झाडेझुडपे कापण्याचे राहून गेले आहे, असे पेडणेचे नगराध्यक्ष शिवराम तुकोजी यांनी सांगितले.

समन्वय साधून उपाययोजना करण्याची आवश्यकता

पेडणे ते हरमल या मुख्य रस्त्याच्या मध्ये पेडणे ते कोनाड हा सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंतचा रस्ता पेडणे नगरपालिकेच्या हद्दीत येतो. असे असले तरी हा रस्ता मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. गेली दहा वर्षे या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही.

सार्वजनिक बांधकाम खाते गेल्या काही वर्षांपासून खड्डे पडलेल्या ठिकाणी ‘पॅच’ मारण्याचे काम करत आलेले आहे. यंदा तर या रस्त्यावर अनेक ठिकाणी ‘जेट पॅचर’ने खड्डे बुजविण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा रस्ता सगळीकडे खडबडीत होऊन त्यावर खड्डे पडले आहेत.

रस्त्याला खड्डे पडण्यास सुरवात झालेली आहे. या खड्ड्यांत साचलेले पावसाचे पाणी दुचाकीस्वारांच्या अंगावर उसळते. तसेच खड्ड्यांमुळे अपघातही होतात. पेडणे सार्वजनिक बांधकाम खाते व पेडणे नगरपालिका यांनी समन्वय साधून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Goa News: पेडणे सार्वजनिक बांधकाम खाते व पेडणे नगरपालिका यांनी समन्वय साधून उपाययोजना करण्याची आवश्यकता
Pernem Road: एका वर्षात उखडले रस्त्याचे डांबर; वाहनचालक त्रस्त

पालिका, पंचायतींकडे यंत्रसामग्रीचा अभाव

मोपा विमानतळ झाल्यापासून पेडणे ते कोनाड मार्गावरील वाहतुकीत वाढ झालेली आहे. तर पेडणे ते आयटीआयपर्यंत या घाटात मोठी वळणे आहेत. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या झाडाझुडपांमुळे वाहतुकीस व्यत्यय येतो. या अगोदर मुख्य रस्त्यावरील झाडेझुडपे कापण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खाते करत असे; पण काही वर्षांपासून ही जबाबदारी त्या-त्या भागातील नगरपालिका व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. मात्र, नगरपालिका किंवा पंचायतींकडे आवश्यक यंत्रसामग्री नसल्याने झाडाझुडपांबरोबर अन्य मोठी झाडेही रस्त्यावर आलेली आहेत. याचा वाहनांना त्याचा त्रास होतो.

Goa News: पेडणे सार्वजनिक बांधकाम खाते व पेडणे नगरपालिका यांनी समन्वय साधून उपाययोजना करण्याची आवश्यकता
Pernem News : पेडणेतील नागरिकांना उत्तम सेवा द्यावी : प्रवीण आर्लेकर

पेडणे ते कोनाडपर्यंत वळणावळणांचा अरुंद रस्ता

पेडणे बाजार ते आयटीआयपर्यंत चढणीचे अंतर हे तीन किलोमीटरचे आहे. पेडणे ते हरमल या मार्गावर पेडणे ते कोनाडच्या काही भागापर्यंत सुमारे साडेचार किलोमीटर अंतर हे पेडणे नगरपालिका क्षेत्रात येते. या अशा दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडेझुडपे वाढलेली असून या अशा झाडाझुडपांनी रस्ता व्यापला आहे. पेडणे ते कोनाड हा रस्ता अगोदरच वळणावळणांचा असून अनेक ठिकाणी हा रस्ता अरुंद आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com