Pernem
Pernem Dainik Gomantak

Pernem News : पेडणेतील नागरिकांना उत्तम सेवा द्यावी : प्रवीण आर्लेकर

Pernem News : केपे अर्बनच्या २३ व्या शाखेचे उद्‍घाटन
Published on

Pernem News :

पेडणे, केपे अर्बन मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा उत्तम व्यवहारामुळे राज्यात विस्तार झाला असून पेडणेत शाखा सुरू केल्यामुळे पेडणेकरांना चांगली सोय होणार आहे. या शाखेच्या माध्यमातून पेडणेकरांनाही उत्तम सेवा मिळणार आहेत.

शाखेतील कर्मचाऱ्यांनी पेडणेतील नागरिकाशी चांगले संबंध जनतेची सेवा करावी, असे आवाहन पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पेडणे येथे केपे अर्बन मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या पेडणे शाखेचे उद्‌घाटन प्रसंगी केले.

केपे अर्बन मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या २३ व्या शाखेचे उद्‍घाटन पेडणे येथील कृषी उत्पादन मार्केटिंग यार्डमध्ये करण्यात आले. आमदार प्रवीण आर्लेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

Pernem
PM Narendra Modi B'Day: अक्षय कुमार-कंगना रणौतसह बॉलिवूड स्टार्सनी दिल्या PM मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

संस्थेचे चेअरमन प्रकाश वेळीप, नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, निवृत्त पोलिस अधीक्षक आपा तेली, जनरल मॅनेजर संतोष गावकर, मॅनेजर तन्मय बोरकर, संचालक हर्षा रेगे, संचालक नागेश वेळीप, संचालक सतीश वेळीप, संचालक परेश कुंकुळकर, रेगे संचालक परेश कुंकळकर, संचालिका सुभा फळदेसाई, संचालिका ज्योती वेळीप, संचालक विनोद जांबावलीकर, संचालक भिकू वेळीप उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com