Pernem Road: एका वर्षात उखडले रस्त्याचे डांबर; वाहनचालक त्रस्त

Goa Road: कोनाड ते गावडेवाडादरम्यान निकृष्ट दर्जाचे काम
Goa Road: कोनाड ते गावडेवाडादरम्यान निकृष्ट दर्जाचे काम
Pernem Road Dainik Gomantak

कोनाड ते गावडेवाडा, देऊळवाडा, कोरगाव व देवसू-तिस्क ते देवसू तिठ्यापर्यंत २०२१ ते २०२२ मध्ये सुमारे सहा किलोमीटर केलेले डांबरीकरण त्याच वर्षीच्या पावसाळ्यात वाहून गेलेले आहे. तर या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून पेडणे ते हरमल या रस्त्यावर वाहतूक करणाऱ्यांना वाहने चालविणे त्रासदायक ठरत आहे.

पेडणे ते हरमल या मुख्य रस्त्यावरील कोनाड ते गावडेवाडा-कोरगावपर्यंत तसेच देवसू-तिस्क ते देवसू तिठ्यापर्यंत सुमारे सहा ते सात किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करताना आवश्यक प्रमाणात डांबर वापरलेले नव्हते.

तसेच या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने व पावसामुळे या रस्त्यावर बऱ्याच जागी डांबरीकरण केलेला भाग वाहून गेला.

अनेक ठिकाणी रस्ता उखडल्याने तर काही ठिकाणी पावसाचे पाणी साचून रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. तसेच या रस्त्याची उखडलेली खडी एकत्र झाल्याने दुचाकी वाहनांना धोकादायक ठरत आहे.

Goa Road: कोनाड ते गावडेवाडादरम्यान निकृष्ट दर्जाचे काम
Pernem Road : तोरसे येथे महामार्गावरील डबकी स्‍वखर्चाने बुजवली; पंचायत मंडळाचा स्‍तुत्‍य उपक्रम

मुख्यमंत्र्यांनी जाहीर करूनही कंत्राटदारावर कारवाई नाहीच!

एका वर्षाच्या आत रस्त्याची अशाप्रकारे दुर्दशा होत असल्यामुळे कोरगाव ग्रामसभेत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. तर याच काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल तसेच आवश्यकता असल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे जाहीर केले होते; पण अद्याप अशाप्रकारे रस्त्याचे डांबरीकरण केलेल्या कंत्राटदारावर कुठलीही कारवाई झालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com