Goa Sand Extraction
ArrestCanva

Goa Sand Extraction: वाळू व्यवसायाच्या वादातून गोळीबार, पेडणे पोलिसांची मोठी कारवाई; 2 पोलिसांसह 5 संशयितांना अटक

Goa Police Action: गोव्यात वाळू उपशाच्या (Sand Extraction) व्यवसायातील वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणात पेडणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली.
Published on

Uguem Firing Incident: गोव्यात वाळू उपशाच्या व्यवसायातील वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणात पेडणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली. पेडणे तालुक्यातील उग्वे (Uguem) येथे झालेल्या या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळू उपशाच्या बेकायदेशीर व्यवसायावरुन वाद सुरु झाला. हा वाद इतका वाढला की त्याचे रुपांतर थेट गोळीबारामध्ये झाले. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पेडणे (Pernem) पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. याप्रकरणी दोन पोलिसांसह पाच स्थानिकांना अटक करण्यात आली. नेहाल महाले (20), आशिष महाले (24), आकाश महाले (24), ऋषिकेश महाले (32) आणि गंगाराम महाले (32) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

Goa Sand Extraction
Goa Sand Extraction: इशारा दिला; पण होड्यांवर कारवाईसाठी अधिकारी फिरकलेच नाहीत...

दरम्यान, या घटनेमुळे उग्वे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यात सामील असलेल्या 5 संशयितांना अटक केली. या गोळीबारात कोणतेही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरु केली असून यामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, तसेच गोळीबारात वापरलेले शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळे पेडणे परिसरात बेकायदेशीर वाळू उपसा आणि त्यातून होणारे गुन्हेगारी प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com