फक्त आमच्याच वाड्याला पाणी का नाही? पाळेवाडा-कोरगाववासीयांचा सवाल; दोन दिवसांत प्रश्‍न न सुटल्यास मोर्चाचा इशारा

Korgaon Palewada water supply issue: तीन महिन्यांपासून नळाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
Korgaon Palewada water supply issue
Korgaon Palewada water supply issueDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पेडणे तालुक्यातील कोरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील पाळेवाडा येथे गेल्या तीन महिन्यांपासून नळाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. इतर वाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू असताना केवळ आमच्या पाळेवाडा भागाला पाणी का मिळत नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.

स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पाणी विभाग) अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही समस्या सोडवली जात नसल्याचे सांगितले. उपसरपंच दिवाकर जाधव यांनी सांगितले की, ‘आम्ही संबंधित विभागाला दोन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पेडणे येथील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.

Korgaon Palewada water supply issue
Goa Divorce Cases: गेल्‍या 5 वर्षांत तुटल्‍या 2,135 जोडप्‍यांच्‍या साताजन्‍माच्‍या गाठी, राज्‍यात घटस्‍फोटांचा 'स्‍फोट'; सासष्‍टी आघाडीवर

या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा असून सर्व घरांपर्यंत पोहोचत नाही. काही वेळा रात्री उशिरा पाणी येत असल्याने महिलांना जागरण करून पाणी भरावे लागत आहे. ‘आम्ही काम करावे की पाणी भरत बसावे?’ अस्सा संतप्त सवाल स्थानिक महिलांनी उपस्थित केला.

Korgaon Palewada water supply issue
Goa Tourism: गोव्यातला 'स्वर्ग...'! शॉपिंग, बीच शॅक्स अन् अथांग सागराचं लावण्य अनुभवायचयं; 'हा' समुद्रकिनारा तुमच्यासाठी बेस्ट

सरकारने तातडीने दखल घ्यावी

चांदेल येथील पाणी प्रकल्पातून संपूर्ण पेडणे तालुक्याला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दाब कमी असल्याने काही भागांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची समस्या कायम आहे. त्यामुळे काही नागरिक विहिरी व बोअरवेलवर अवलंबून राहतात, तर अनेकांना नळाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सरकारने या समस्येची तातडीने दखल घेऊन नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com