Pisteshwar Sattari : सत्तरीच्या परिसरातील पिस्तेश्वर म्हणजे 'म्हादई'ची श्रीमंती

सत्तरी तालुक्यातून वाहणाऱ्या म्हादई नदीमुळे तिथल्या परिसराला निसर्ग सौंदर्यांचे मोठे देणे लाभलेले आहे.
Pisteshwar Sattari | Mahadayi River
Pisteshwar Sattari | Mahadayi RiverDainik Gomantak
Published on
Updated on

पद्माकर केळकर 

सत्तरी तालुक्यातून वाहणाऱ्या म्हादई नदीमुळे तिथल्या परिसराला निसर्ग सौंदर्यांचे मोठे देणे लाभलेले आहे. पण कर्नाटकात होऊ घातलेल्या कळसा, भांडुरा प्रकल्पामुळे म्हादईच्या वाहण्यावर संक्रांत येऊ शकते. या नदीच्या प्रवाहातून, परिसरातून फिरताना मनमुराद आनंद मिळतो. म्हादईच्या परिसरात असलेली काही विलक्षण स्थळे तर भ्रमंती करणाऱ्यांना खूप आकर्षून घेतात. त्यापैकी एक आहे पिस्तेचा परिसर. (Pisteshwar Sattari)

Pisteshwar Sattari | Mahadayi River
Goa Assembly Session Last Day: 'म्हादई'वरील चर्चेसह, शेवटच्या दिवशी विधानसभेत काय घडलं? जाणून घ्या

नगरगाव व सावर्डे पंचायत क्षेत्रातील उस्ते, कडतरी, सोनाळ, नानोडा ही गावे ओलांडल्यानंतर पिस्तेश्वर मंदिर हे गोव्यात सध्या बरेच नावारूपाला आले आहे. हा पिस्तेश्वरचा देव, नदीत असलेली कोंड व त्या कोंडीत असलेले महाकाय, विलोभनीय देवाचे मासे ही म्हादईची श्रीमंती आहे. गोव्याच्या कानाकोपऱ्यातून लोक पिस्तेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी येतात. पिस्तेश्वर ही तेथील राखण देवता आहे.

म्हादईच्या काठावर पिस्तेश्वराचे पाषाण आहे. लोकांची या देवावर मोठी श्रध्दा आहे. तिथे पोहोचण्यासाठी सत्तरीतल्या सोनाळ, उस्ते गावातून पायी चालत जावे लागते. त्यासाठी सुमारे 14 किलोमीटरची पायपीट करावी लागते. आधी, उस्ते गावच्या झाडांनी या भागात असलेले बसवेश्वर मंदिर लागते व तिथून पुढचा प्रवास सुरू होतो. वाटेत म्होवाचो गुणो, कणसगाळ, काजरेधाट, कडवळ, साठेली, पेंडाळ अशी गावे मिळतात. सुमारे दोन अडीच तास चालावे लागते.

या गावात दुचाकी, चारचाकी वाहन जाऊ शकते पण कच्च्या रस्त्यामुळे बरीच कसरत करावी लागते. म्हादई नदीच्या प्रवाहातून चालल्यानंतर चढउतार मिळतात. पायी जाताना मोठ्या व जुन्या झाडांची मिळणारी थंडगार सावली, थंड पाणी त्यामुळे फार त्रास जाणवत नाही. पिस्तेश्वर मंदिरात एखादी मनोकामना पूर्ण होण्यासाठी नारळ ठेवून नवस केला जातो. त्यामुळे नवस फेडण्यासाठी लोकांची पिस्तेश्वरला दरवर्षी फेरी असते.

पिस्तेश्वराच्या वाटेवरची मोठमोठी झाडे, त्यावर चढलेल्या विविध आकाराच्या वेली, त्यांची आकर्षक फुले पाहून मन फुलून जाते. पिस्तेश्वरला पोहोचताच प्रथम दिसतात ते पिस्तेश्वर कोंडीतील म्हादई नदीतील मोठे आकर्षक मासे. जाणारे लोक सोबत तांदुळ, चुरमुरे या माशांना देतात. हे पिस्तेश्वर देवाचे पवित्र मासे मानले जातात त्यामुळे ह्या माशांना कोणीच पकडत नाही. पिस्तेश्वरचा हा परिसर दैवी मानला जातो. त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारच्या अमंगळतेला व अस्वच्छतेला मनाई आहे.

कर्नाटकाच्या निर्णयामुळे कळसा, भांडुरा इथले धरण प्रकल्प बांधले गेले तर पिस्तेश्वरच्या नजीक वहात असलेल्या म्हादईच्या पाण्यावर मोठा परिणाम होऊन येथील देवरूपी माशांनासुध्दा भविष्यात बाधा पोहचणार असल्याची भीती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com