Goa Crime News : अज्ञातांची स्‍कूल बसचालकाला मारहाण, विद्यार्थ्यांनी केला आरडाओरडा अन्

कुर्टी-फोंडा येथील प्रकार; संशयितांचा पोबारा
Kadamba For School Bus
Kadamba For School BusDainik Gomantak
Published on
Updated on

कुर्टी येथील एका विद्यालयाच्या बसचालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. मारहाण केल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पोबारा केला.

कुर्टीतील एका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दुपारी शाळा सुटल्यावर घरी पोचवण्यासाठी जीए 03 एक्स 519 या क्रमांकाचे बसचालक एकनाथ काकोडकर (वय 51, रा. कोपरवाडा-कुर्टी) हे निघाले असता, त्यांना चौघा युवकांनी मारहाण केली. या मारहाणीवेळी विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील लोक धावून आले; परंतु हल्लेखोरांनी पलायन केले.

Kadamba For School Bus
Goa Dairy : गोवा डेअरीवर प्रशासकीय राजवट; आजी-माजी 14 संचालक अपात्र

विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली ही बस कुर्टी येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीजवळील जोडरस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या चौघा युवकांनी अडवली. या चारहीजणांनी अर्वाच्च शब्दांत शिवीगाळ केली, तर दोघांनी बसमध्ये प्रवेश करून केबिनमध्येच चालकाला बेदम मारहाण केली.

चालक एकनाथ काकोडकर यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांच्या डोक्याला व छातीला मार लागला. या मारहाणीचा पालक-शिक्षक संघाने निषेध व्यक्त करून हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी केली आहे.

Kadamba For School Bus
Energy Literacy Training Portal: सौर ऊर्जेच्या दिशेने सरकारचे एक पाऊल, जागरूकता वाढवण्यासाठी 'हे' पोर्टल झाले लाँच

काय घडले?

  • बसचालकाला मारहाण होत असल्याचे पाहून बसमधील विद्यार्थी घाबरले.

  • त्यांनी आरडाओरडा केला; परंतु नेमके काय चालले आहे, हे कुणालाच कळले नाही.

  • तेथून जाणाऱ्या काहीजणांनी वाहन थांबवून चौकशी केली असता, चारही युवकांनी दुचाकीवरून पळ काढला.

  • सर्व हल्लेखोर हिंदीत बोलत होते. मारहाणीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

  • याप्रकरणी फोंडा पोलिसांत तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास

बस रस्त्यावरच थांबलेली पाहून आणि मुलांचा आरडाओरडा ऐकून तेथून जाणारे इतर वाहनचालकही थांबले. काही वाहनचालक बसगाडीकडे येत असल्याचे पाहून हल्लेखोर संधी साधून पळून गेले. या हल्लेखोरांचे वर्णन पोलिसांना देण्यात आले असून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे हल्लेखोरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com