Goa: कदंब बसस्थानकावर बसचा तुटवडा, प्रवासी त्रस्त

राज्य वाहतूक संचालक किंवा कदंब वाहतूक मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी वास्कोवासीय करीत आहे.
पणजी कदंबा स्थानकावर बसची वाट पाहत ताटकळत बसलेले वास्कोतील प्रवाशी
पणजी कदंबा स्थानकावर बसची वाट पाहत ताटकळत बसलेले वास्कोतील प्रवाशीDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: कदंब वाहतूक मंडळाच्या मुख्य बस स्थानकावरून ऐन चतुर्थी काळात वास्को ते पणजी तसेच परत वास्को कदंबा बसची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवशांना आपल्या निवासस्थानी जाताना खूप त्रास सहन करावा लागतो. दररोज पणजी ते वास्को जाण्यासाठी प्रवाशांना किमान पाऊण तास वाट पहावी लागते. या विषयी कदंब मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारल्यास उडवा-उडवीची उत्तर देत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. तसेच पणजी कदंबा स्थानकावर याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. या प्रकरणी राज्य वाहतूक संचालक किंवा कदंब वाहतूक मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी वास्कोवासीय करीत आहे.

पणजी कदंबा स्थानकावर बसची वाट पाहत ताटकळत बसलेले वास्कोतील प्रवाशी
पणजी कदंबा स्थानकावर बसची वाट पाहत ताटकळत बसलेले वास्कोतील प्रवाशीDainik Gomantak

राज्य सरकारला जास्त जकात नाका (ऑक्ट्राय) वास्कोतून येत असून सुद्धा सरकार वास्कोवासियांवर सदैव अन्याय करीत आलेला आहे. वास्को बंदर शहर असल्याने येथील जास्त जकात नाका राज्य सरकारच्या तिजोरीत जातो. वास्कोतुन जकात नाका (ऑक्ट्राय) राज्य सरकार घेऊन सुद्धा विकासापासून वास्को वंचित राहिलेले आहे. आता तर चक्क कदंब बस सेवा कमी प्रमाणात उपलब्ध करून एक प्रकारे सरकारने छळ सुरू केला आहे. गणेश चतुर्थीच्या सणानिमित्त वास्कोतून गोव्यातील विविध गावातील नागरिक आपल्या निवासस्थानी चतुर्थी साजरी करण्यासाठी रोज ये-जा करीत असतात. यासाठी त्यांना गावी जाण्यासाठी वास्कोत कदंबा बसचा उपयोग करावा लागतो. तसेच गावी चतुर्थी दर्शन झाल्यानंतर कामासाठी पुन्हा यावे लागते. यावेळी त्यांना पुन्हा पणजी ते वास्को पर्यंत जाण्यासाठी कदंबा बसचा उपयोग करावा लागतो.

कारण वास्को ते पणजी, मडगाव ते पणजी राज्य सरकारने राष्ट्रीय करण केल्याने येथे फक्त राज्य कदंब वाहतूक मंडळाच्या बसमधून प्रवास करावा लागतो. पण गेल्या काही आठवड्यापासून पणजी ते वास्को जाण्यासाठी पणजी कदंबा बस स्थानकावर वास्कोच्या प्रवाशांना कदंब बसची किमान पाऊण तास वाट पाहावी लागते. बस स्थानकावर असलेल्या कदंबा वाहतूक मंडळाच्या अधिकाऱ्यांना वास्को जाण्याची बस का उपलब्ध नाही असे विचारल्यास उपस्थित अधिकारी आपला आवाज वाढवून प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे देतात. अनेक पर्यटक टॅक्सीचे भाडे परवडत नसल्याने दाबोळी विमानतळ, वास्को रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी कदंब बस प्रवास करतात.मात्र येथे बस उपलब्ध होत नसल्याने बहुतेक वेळा पर्यटकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन गाठण्यासाठी वेळ होतो. गोवा हे पर्यटन स्थळ असून याचा एक भाग राज्य कदंब वाहतूक मंडळ सुद्धा असल्याने त्यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे द्यायला पाहिजे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पणजी कदंबा स्थानकावर बसची वाट पाहत ताटकळत बसलेले वास्कोतील प्रवाशी
Goa Curfew: केरळमधून गोव्यात येणाऱ्यांना विलगीकरण सक्तीचे

कोरोना महामारीमुळे राज्य कदंब वाहतूक मंडळाला नुकसानीचा सामना करावा लागला. तसेच कदंब बस मधून नागरिक कमी प्रमाणात प्रवास करीत असल्याने कदंब वाहतूक मंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेला आहे. यासाठी पणजी ते वास्को, वास्को ते पणजी कदंबा बस किमान पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतराने सोडावी अशी मागणी होत आहे.वाहतूक संचालकाने याविषयी गंभीरतेने लक्ष घालून प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी वास्कोवासियांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com